अनवर्दे खुर्द येथे महादेव मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा साजरा
चोपडा दि.११(प्रतिनिधी): तालुक्यातील अनवर्दे खुर्द येथे पुरातन काळात सापडलेल्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत आहे
तालुक्यातील अनवर्दे खुर्द येथे जिजाबराव देवराम बोरसे यांच्या विहिरीत गळ काढताना पंधरा ते वीस वर्षांपूर्वी महादेवाची पिंड सापडलीअसता त्यांनी ब्राह्मणांना विचारून अधिक माहिती घेतली असता भटजींनी महादेवाची पिंडाची पूजा करून मूर्तीला बसविण्यात यावेअसे सांगितले होते त्यानुसार संपूर्ण बोरसे परिवाराने एकत्रित येत प्राणप्रतिष्ठा सोहळा ठेवला आहे. त्यानुसार महादेवाची पिंडाची(शिवलिंग) काल संपूर्ण गावात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मधुकर विश्वासराव बोरसे, रवींद्र युवराज बोरसे, संभाजी शिवाजी बोरसे, प्रमोद जिजाबराव बोरसे, महेश रामराव बोरसे, शेखर विश्वासराव बोरसे, सुनील बोरसे आदींनी सहभाग घेतला.