आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते चोपडा आगारात "५ नवीन अत्याधुनिक डिझेल बसेसचे लोकार्पण

 आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते चोपडा आगारात "५ नवीन अत्याधुनिक डिझेल  बसेसचे लोकार्पण 



चोपडा,दि.१२(प्रतिनिधी) विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे व माजी आ.सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री नामदार श्री प्रतापजी सरनाईक  यांच्याकडील संयुक्त यशस्वी पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चोपडा आगाराला "५ नवीन अत्याधुनिक डिझेल लालपरी बसेस" प्राप्त होऊन काल दिनांक. ११ ऑगस्ट २०२५ रोजी  आमदार महोदयांचे शुभहस्ते चोपडा बस स्थानकात लोकार्पण सोहळा ढोल ताशांचे गजरात पार पडला.

यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, डिपो मॅनेजर महेंद्र पाटिल ,पोनि  मधुकर सावळे, कृऊबा समिती सभापती नरेंद्र पाटिल,जेडीसीसी बॅंक संचालक घनश्याम अग्रवाल, शिवदास पाटिल, गोपाल पाटिल, विजय पाटिल, किरण देवराज, विकास पाटिल, ,राजेंद्र पाटिल, प्रकाश राजपुत, नितिन पाटिल, प्रकाश रजाळे, गोपाल चौधरी, गणेश पाटिल, प्रताप पाटिल, कुणाल पाटिल, गोरख कोळी, सैय्यद  मझहर , तसेच परिवहन विभाग कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने