शेतकऱ्यांनो..!" कॅन्सर मुक्त जळगाव जिल्ह्यासाठी रासायनिक खतांचा वापर टाळा..

 शेतकऱ्यांनो..!" कॅन्सर मुक्त जळगाव जिल्ह्यासाठी रासायनिक खतांचा वापर टाळा..

♦️कृषी विभाग,शेतकरी कृती समिती व कृषी दुकानदार संघटना( माफदा)यांचे संयुक्तीक जनजागृती प्रयत्न सुरू 


जळगाव दि.७(प्रतिनिधी) :- रासायनिक खते व कीटकनाशक यांच्या वापरात जळगाव जिल्हा देशात अव्वल आहे,त्यामुळे शेती खराब होत आहेच, सोबत कॅन्सर चे प्रमाण प्रचंड वाढत आहे.ते थांबवण्यासाठी साऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे विभागाने शिफारस केल्यानुसार शक्य असेल त्या शेतकऱ्यांनी जमिनीची तपासणी करून खते दिल्यास निश्चित बचत होईल व जमिनी सोबत आपल्या साऱ्यांचे आरोग्य सुधारेल असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे यांनी केले.

   जिल्हाधिकारी आयुषजी प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कृषी अधिकारी कुरबानजी तडवी व जिल्हा कृषी विकास अधिकारी पद्मनाभजी म्हस्के  यांनी कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या विविध पीक निहाय खतांच्या मात्रांचा योग्य तक्ता उपलब्ध करून दिल्यानंतर जळगाव जिल्हा कृषी दुकानदार यांच्या संघटनेमार्फत  विनोदजी तराळ, कैलासजी मालू यांनी बॅनर बनवून देणे साठी पुढाकार घेतला व विविध तालुक्यात प्रत्येक कृषी केंद्रात पोहचावीत असून ते  बॅनर लावावे असा आग्रह करीत आहेत त्या साऱ्यांचे आभार शेतकरी कृती समितीचे एस बी पाटील यांनी मानले व लवकरच कीटकनाशक चे देखील तक्ते तयार होतील आणि जळगाव येथील एकत्रित सभेत जिह्यातील साऱ्या दुकानदार बंधूंनी कॅन्सर मुक्त जळगाव अभियानात योगदान देण्याचा शब्द दिला तो खरा होईल असा आशावाद देखील व्यक्त केला.

  चोपडा तालुक्यातील कृषी दुकानदार संघटनेच्या वतीने डोंगर पाटील यांनी लवकरच प्रत्येक दुकानात तक्ता पाठवीत असून.आमच्या सोबत गावा गावातील जनतेने बनावट खतांपासून व कीटकनाशकांपासून सावध राहिले पाहिजे ,तसेच बरेच शेतकरी  अंकलेश्वर येथून सरळ कीटकनाशक व तणनाशक आणत असून त्यात बरेच शेतकरी फसले त्यांचे व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत ते टाळून अधिकृत डीलर कडून घेतल्यास फसवेगिरी टळू  शकेल असे मत व्यक्त केले.

 यावेळी कृषी अधिकारी दीपक साळुंखे,आर एम पाटील,आर आर चौधरी,शेतकरी कृती समितीचे एस बी पाटील, अँड हेमचंद्र पाटील,कुलदीप राजपूत,अजित पाटील,प्रशांत पाटील,नीलेश पाटील, कृषी केंद्रांचे संचालक डोंगर पाटील,प्रदीप अग्रवाल,नितीन चौधरी,अनिल पाटील,मनोज अग्रवाल,दीपक जैस्वाल,कल्याण पाटील,सतीश पाटील हे हजर होते.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने