चोपडा बी फार्मसी महाविद्यालयाला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार जाहीर
चोपडा दि.७(प्रतिनिधी) : येतील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाला कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव परिक्षेत्रातील व्यावसायिक संलग्नित महाविद्यालय या प्रवर्गातील "*उत्कृष्ट व्यावसायिक महाविद्यालय २०२४"* जाहीर झाला आहे.
कबचौउमवि महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थी सहभाग, संशोधन कार्य, समाजाभिमुख उपक्रम, तसेच प्रशासनिक पारदर्शकता या सर्व निकषांवर आधारित हा पुरस्कार दिला जातो.
महाविद्यालय गेल्या ३३ वर्षा पासून ग्रामीण भागात ज्ञानदानाचे काम करत आहे. महात्मा गांधी शिक्षण मंडळाने लावलेल्या या छोट्या वृक्षाचा आज मोठा वटवृक्ष झालेला आहे आजमितीपर्यंत महाविद्यालयातुन असंख्य विद्यार्थ्यांनी पदविका पदवी व पदव्युत्तर शिक्षण करून देश-विदेशात कार्यरत आहेत. महाविद्यालयाने ३ वेळा एनबीए व नॅक मूल्याकंन प्राप्त आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौतम वडनेरे यांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सांगितले, "हा पुरस्कार संपूर्ण शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांच्या सहकार्यामुळे शक्य झाला आहे. पुढील काळातही आम्ही गुणवत्ता व नवोपक्रमांची परंपरा कायम ठेवू.व पुरस्काराचे श्रेय माझी विद्यार्थी,विद्यार्थी ,पालक महाविद्यालयाप्रती आस्था असलेल्या सर्व घटकांना दिले आहे या पुरस्काराने महाविद्यालयाच्या प्रतिमेला वाव मिळेल आणि भविष्यात आम्ही अधिक ऊत्तम करणार आहोत."
या पुरस्कारामुळे चोपडा शिक्षण क्षेत्रात एक नवे अधिष्ठान निर्माण झाले असून, परिसरातील विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल विविध शैक्षणिक संस्था, लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सदर यशाचे संस्थेचे अध्यक्ष ऍंड भैय्यासाहेब संदीप पाटील उपाध्यक्ष श्रीमती आशाताई पाटील सचिव डॉ सौ स्मिताताई पाटील व कार्यकारी मंडळ यांनी कौतूक केले व भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.तसेच पुरस्काराकरिता कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांचे अनेकानेक आभार प्राचार्यांनी व्यक्त केले आहे