आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या विशेष प्रयत्नांनी चोपडा आगारात सहा ईलेक्ट्रीक बसेस दाखल होणार ..लवकरच लोकार्पण सोहळा
चोपडा दि.५(प्रतिनिधी) : आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नाने चोपडा आगारात लवकरच ६ इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या आहेत.त्यामुळे आता डिझेल बसेस नंतर पुन्हा इलेक्ट्रीक बस आल्याने तालुक्यातील प्रवाशींना सुखाच्या सफरचा आनंद लुटता येणार आहे.लवकर ६ इलेक्ट्रिकल ई- बसेसचा लोकार्पण सोहळा चोपडा आगारातील चार्जिंग स्टेशन चे काम पुर्ण झाल्यावर होणार असल्याची माहिती आमदार कार्यालयाचे अधिकृत सुत्रांनी दिली आहे.एकंदरीत या बसेसच्या प्रवासाची मजा चाखण्यासाठी थोडा दम धरावा लागणार आहे.
चोपड्याचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार सौ. लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नाने चोपडा आगारास २ कोटींचा निधी प्राप्त झाल्याने आगाराला प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले तसेच नुकतेच चोपडा आगाराला ५ डिझेल बसेस ही मिळाल्या होत्या. शासन दरबारी पाठपुरावा व प्रयत्न करून चोपडा आगारात लवकरच ६ इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या असल्याने चोपडा तालुक्यातील प्रवाशांच्या समस्या सुटण्यास मदत झाली आहे. याप्रसंगी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार सौ.लताताई सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे , व अजितदादा पवार ,परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे यांचे आभार मानले