प्रताप विद्या मंदिरात विशेष कवायतींचा सराव
चोपडा दि.५(प्रतिनिधी) : चोपडा एज्युकेशन सोसायटी, संचलित प्रताप विद्या मंदिर, चोपडा येथील क्रीडा भागाच्या वतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत शासकीय परिपत्रकानुसार- दिनांक -2/ ऑगस्ट/ 2025 शनिवार सकाळ रोजी देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सुंदर रीतीने कवायतीचे सादरीकरण सराव खास शैलीत करण्यात आला.
कवायतीचे मार्गदर्शन मुख्याध्यापक श्री. पी. एस गुजराती सर यांच्या सांगण्यावरून श्री .एन .एन .महाजन सर यांनी केले. कवायतीचे व्हिडिओ श्री. सुदर्शन महाजन यांनी काढले व फोटोग्राफ श्री. रोहन पाटील सर यांनी काढले. कवायतीतील देशभक्तीपर गीते श्री. अकमल सरांनी माइकवर लावले. या सुंदर व्हिडिओंचे संकलन व व्हिडिओ एकत्रीकरण श्री. एन. वाय. मलिक सर यांनी केले. सर्व शिक्षक बंधू भगिनींनी त्यासाठी मेहनत घेतली. या कार्यक्रमास सकाळ विभागाचे पर्यवेक्षक श्री. पंकज नागपुरे सर ,ज्येष्ठ शिक्षक श्री. एस एस खान सर व सर्व शिक्षक बंधू-भगिनी हजर होते.