चोपडा रोटरी क्लब कार्याचा महाराष्ट्रात डंका..रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे डझनभर पुरस्कार प्राप्त
चोपडा,दि.५ (प्रतिनिधी )रोटरी क्लब ऑफ चोपडा यांनी रोटरी वर्ष २०२४-२५ मध्ये समाजोपयोगी आणि प्रभावी उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी करून एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. याच कार्याची दखल घेत रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० ने हॉटेल ग्रॅण्ड जलसा, अकोला येथे आयोजित वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात चोपडा रोटरी क्लबला १२ प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविले.रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० मध्ये गडचिरोलीपासून नाशिकपर्यंतचा पूर्व-पश्चिम भाग येतो. या जिल्ह्यांतील एकूण १२० रोटरी क्लब्स मधून चोपडा क्लबचे कार्य ठळकपणे उठून आले आहे.
🏆 प्राप्त पुरस्कारांची यादी:
🌹 बेस्ट रोटरी - रोटरॅक्ट रिलेशनशिप
🌹 बेस्ट रोटरॅक्ट क्लब प्रोजेक्ट
🌹 बेस्ट एंटरप्रिनर करिअर गाईडन्स
🌹 गव्हर्नर स्पेशल ॲप्रिसिएशन अवॉर्ड – रोटे. नितीन अहिरराव (संयुक्त सचिव, रोटरी डिस्ट्रिक ३०३०)
🌹 बेस्ट वर्क इन ट्रायबल एरिया
🌹 बेस्ट वर्क डन इन रेन वॉटर हार्वेस्टिंग
🌹 बेस्ट वर्क ऑफ RCC क्लब
🌹 बेस्ट नॉन-मेडिकल प्रोजेक्ट
🌹 बेस्ट पब्लिक रिलेशनशिप
🌹 डायमंड सायटेशन ऑफ एक्सलन्स
🌹 बेस्ट वर्क डन बाय क्लब
🌹 बेस्ट क्लब सेक्रेटरी – रोटे. भालचंद्र पवार
या पुरस्कारांचे वितरण प्रांतपाल रोटे. राजिंदर खुराना यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रांतपाल नाना शेवाळे, माजी प्रांतपाल किशोर केडिया, शब्बीर शाकिर, आनंद झुंझुंनवाला, आशा वेणुगोपाल, के.एस. राजन, DGE राजेश पाटील, DGN किशोर राठी यांच्यासह असंख्य रोटरी सदस्य उपस्थित होते.
या गौरव सोहळ्यात रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष रोटे. प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदणकर, सचिव रोटे. भालचंद्र पवार, संयुक्त सचिव रोटे. नितीन अहिरराव, माजी अध्यक्ष रोटे. विलास पी पाटील, कोषाध्यक्ष प्रदीप पाटील, सह सेक्रेटरी संजय बारी सर यांनी क्लबचे प्रतिनिधित्व केले.
रोटरी क्लब चोपडाचे ठळक समाजोपयोगी प्रकल्प:
🔹 सलग ६ वर्षांपासून दरवर्षी रोटरी उत्सवाचे यशस्वी आयोजन
🔹 सुंदर, सुसज्ज आणि कार्यक्षम रोटरी भवन
🔹 गरजूंसाठी नाममात्र दरात वैद्यकीय उपकरणे पुरवणाऱ्या ३ ऑर्थोपेडिक लायब्ररी
🔹 हरताळकर हॉस्पिटलच्या सहकार्याने सुरू असलेले डायलिसिस सेंटर
🔹 जैस्वाल हॉस्पिटलच्या सहकार्याने सेवा देणारी रोटरी ॲम्बुलन्स सेवा
🔹 आणि दरवर्षी अनेक सामाजिक, आरोग्य, पर्यावरण विषयक उपक्रम
ही १२ पुरस्कारांची थाप ही केवळ गौरव नाही तर पुढील कार्यासाठी ऊर्जा देणारा प्रेरणास्रोत आहे.रोटरी क्लब चोपडाने नेहमीच दिखाऊपणापेक्षा समाजाच्या खऱ्या गरजांवर आधारित उपक्रम राबवले आहेत. रोटरीच्या ध्येयाशी एकनिष्ठ राहून, निष्काम भावनेतून जनहितासाठी कार्य करण्याची परंपरा पुढेही कायम राहील, असा विश्वास क्लबच्या वतीने व्यक्त करण्यात आला."सेवा हेच आमचं ब्रीद" या विचारसरणीवर काम करणारा क्लब भविष्यातही समाजासाठी नवनवीन उपक्रम राबवत राहील असे क्लबतर्फे जाहीर करण्यात आले आहे.