चौगाव येथील पोलिस पाटील यांचा प्रांताधिकाऱींच्या हस्ते सत्कार
लासुर,दि.७(प्रतिनिधी) महसूल विभागाकडून दि.१ आगष्ट ते सात आगष्ट हा आठवडा महसूल सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो.तर १ आगष्ट हा महसूल दिवस म्हणून साजरा केला जातो.यात शेती विषयक महात्वाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे, महसूल विभागातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहित केले जाते.याच धर्तीवर चौगाव येथील पोलिस पाटील गोरखसिंग हरचंद पाटील यांनी चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचे पी आय महेश टाक,बीट हवालदार शशी पारधी, सुनील कोळी यांच्या संपर्कात राहून त्यांच्या सहकार्याने सन २०२४/२५ या महसुली वर्षात गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून गावात शांतता ठेवणे, गावातील अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवणे या कार्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल दि.१ आगष्ट रोजी अमळनेर उपविभागीय कार्यालयात अमळनेर भागाचे उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी चोपडा येथील तहसिलदार भाऊसाहेब थोरात, अमळनेरचे तहसीलदार रुपेश कुमार सुराणा तसेच चोपडा व अमळनेर येथील सर्व नायब तहसीलदार चौगाव येथील महसूल अधिकारी भुषण पाटील यादी उपस्थित होते.या कार्यात चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचे पी आय महेश टाक बीट हवालदार शशी पारधी सुनील कोळी व त्यांच्या सर्व स्टाफचे मार्गदर्शन लाभल्यामुळे गोरख पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.या उत्कृष्ट कार्याबद्दल व सन्मानीत करण्यात आल्याबद्दल चौगाव व परीसरातून गोरख पाटील यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.