कै हि मो करोडपती माध्यमिक विद्यालयात पालक-शिक्षक सभा संपन्न
*चोपडा दि.७(प्रतिनिधी)पूज्य साने गुरुजी विद्या प्रबोधिनी मंडळ, चोपडा संचलित कै हि मो करोडपती माध्यमिक विद्यालयात पालक-शिक्षक संघाची सहविचार सभा पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मंगेश भोईटे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता पालक-शिक्षक संघाची कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली.त्यात अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मंगेश भोईटे सर,उपाध्यक्ष श्री.रुपसिंग पावरा, सचिव श्री आर आर बडगुजर, सहसचिव श्रीमती दिपाली बडगुजर व श्री प्रविण अवय्या, यांची निवड करण्यात आली. व पालक प्रतिनिधीचींही सदस्य म्हणून निवड करण्यात आली. सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचा निवडीबद्दल सत्कार विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद यांच्या हस्ते करण्यात आला.*
*त्यानंतर शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विषयावर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. त्यावर मुख्याध्यापक श्री मंगेश भोईटे यांनी विद्यार्थी गुणवत्ता, शासनाच्या व शाळेच्या योजना यासह विविध विषयावरील आपली भूमिका विषद केली. यासोबतच विद्यार्थ्यांसाठी विविध सहशालेय उपक्रम-कार्यक्रम याबाबत माहिती दिली.* *प्रास्ताविक श्री.आर आर बडगुजर सर यांनी केले. सूत्रसंचलन श्रीमती दीपाली बडगुजर मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती व्ही बी साळुंखे मॅडम यांनी केले.*
*कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री ए पी बडगुजर,श्रीमती सी पी बडगुजर, श्रीमती पी सी बडगुजर, श्रीमती एस टी बोरसे, श्रीमती शर्मिला बडगुजर, श्री संजोग साळुंखे, श्री अशोक बडगुजर, श्री सुनील बडगुजर व श्री विलास सनेर यांनी सहकार्य केले.*