पंकज माध्यमिक विद्यालयात पालक शिक्षक सभेत पालक संजीवनी उपक्रम
चोपडा दि.७(प्रतिनिधी): - येथील पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शैक्षणिक वर्ष 2025 26 ची पालक शिक्षक सभा आणि इतर समित्यांच्या सभा पालकांच्या सक्रिय सहभागाने उत्साहात पार पडल्या .पालक शिक्षक संघाच्या सभेच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र पाटील यांनी प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली
जीवन संजीवनी संस्थेचे विभागीय प्रकल्प अधिकारी माननीय एजाज शेख यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात पालकांची भूमिका या विषयावर पालकांना संजीवनी पर मार्गदर्शन केले उपस्थित सर्व पालकांना त्यांनी आपल्या मुलावर मुलीवर विश्वास ठेवून करिअरसाठी प्रोत्साहित करण्याबाबत आवाहन केले त्याचबरोबर तुझे करशील ते योग्यच करशील असा ठाम विश्वास आपल्या मुला-मुलींना द्यावा असेही प्रतिपादन केले कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत परमेश्वर पाटील यांनी सर्व पालकांना विद्यार्थी आरोग्याकडे लक्ष देण्याबाबत पालकांना मार्गदर्शक सूचना दिल्या त्याचबरोबर विद्यार्थ्यांना नियमित शाळेत उपस्थित ठेवण्याबाबत सर्व पालकांना बाबतही आवाहन केले
मुख्याध्यापक बी आर पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरण 2020 मधील शिक्षक बालक आणि विद्यार्थी यांच्या भूमिकेबाबत मार्गदर्शन केले नवीन शैक्षणिक धोरणात अध्ययन निष्पत्तीवर भर असून त्या त्या वर्गाच्या अध्ययन क्षमता विद्यार्थ्यांच्या परिपूर्ण व्हाव्यात याबाबत पालकांनी शिक्षकांसोबत राहून विद्यार्थी विकासात सहयोग करण्याचे आवाहन केले गुणांसोबत विविध व्यावसायिक कौशल्य आपल्या मुलामुलीत कसे वृद्धीकात होईल याबाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर के माने यांनी तर आभार प्रदर्शन विजया पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचारी वृंदांनी सहकार्य केले