मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त चोपड्यात भाजपातर्फे महारक्तदान शिबीर संपन्न

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त चोपड्यात भाजपातर्फे महारक्तदान शिबीर संपन्न 

चोपडा दि.२२(प्रतिनिधी):  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  ना. श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त दि.२२/७/२०२५ रोजी चोपडा येथे  शहर आणि ग्रामीण पूर्व-पश्चीम मंडल एकत्रित येत 'महारक्तदान शिबीर संपन्न झाले.याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जळगाव जिल्हाध्यक्ष(पूर्व)  श्री चंद्रकांतजी बावीस्कर हे उपस्थित होते.

महारक्त दान शिबिर यशस्वी होण्यासाठी जिल्हा महामंत्री श्री राकेश पाटील,शहराध्यक्ष श्री नरेंद्र पाटील, चोपडा ग्रामीण (पूर्व मंडलाध्यक्ष) अध्यक्ष श्री पिंटू पावरा, चोपडा ग्रामीण (पश्चिम मंडलाध्यक्ष) श्री कांतीलाल पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली  श्री हरीश माळी, श्री सचिन बिरारी, श्री अशोक शिंपी, श्री देवदत्त वैद्य, श्री सुनील सोनगीरे, श्री विशाल भोई,भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा चिटणीस महेश बोरसे यांनी मेहनत घेतली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने