चोपड्यात गांधी चौकात कार्यक्रम..“एक श्याम खाटू वाले के नाम"..सैंधवाचे सुप्रसिद्ध गायक ओजस शर्मा व राजगढच्या गान कोकिळा दुर्गा जी गामड यांचे सुमधुर गीतांचे पंचपक्वान श्रोत्यांसाठी
चोपडा,दि.२०(प्रतिनिधी) शहरात गांधी चौकात श्री रिद्धी सिद्धी गणेश जी व पंचमुखी महादेव मंदिराच्या जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त चोपडा शहरात *खाटू श्याम बाबांच्या भव्य दरबार* दिनांक 21 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजेपासून ते श्याम इच्छेपर्यंत श्याम बाबांचा कीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे. तर दुसऱ्या दिवशी 22 जुलै 2025 रोजी दुपारी 11 ते दोन वाजे दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 21 रोजी सकाळी 9:०० वाजेपासून श्री मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलश रोपण ध्वजारोहण ,प्रधान देवता हवन, पूर्णाहूती महाआरतीचा कार्यक्रम होणार आहे तर सायंकाळी ७:०० वाजता "एक श्याम खाटू वाले के नाम "दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. यात ओजस जी शर्मा (सैंधवा) व दुर्गा जी गामड (राजगढ)यांच्या सुश्राव्य वाणीतून भजनांचा कार्यक्रम होणार आहे चोपड्यात प्रथमच "एक शाम खाटू वाले के नाम" हा अनोखा कार्यक्रम होत असल्याने भाविक भक्तांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित देऊन लाभ घ्यावा असे आवाहन रिद्धी सिद्धी गणेश जी, पंचमुखी हनुमान मंदिर विश्वस्त व गांधी चौक व्यापारी मंडळाने केले आहे.