नागलवाडी माध्यमिक विद्यालयात एक पेड माँ के नाम उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना 50 रोपांचे वाटप व वृक्षारोपण
चोपडा दि.१९(प्रतिनिधी) : सामाजिक वनीकरण विभाग व माध्यमिक विद्यालय नागलवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना 50 रोपांचे वाटप तसेच वृक्षारोपण एक पेड माँ के नाम या उपक्रम अंतर्गत शाळेत वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक पी. डी.पाटील यांनी वृक्षारोपण व संवर्धनासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले, तसेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयी जागृती निर्माण व्हावी त्यासाठी एक पेड माँ के नाम हा उपक्रम राबवण्यात आला .
शाळेतील इ.5 वी ते इ.10 वी चे वर्गशिक्षक व विद्यार्थ्यांना तसेच स्काऊट गाईड व हरित सेना यांना वृक्ष संवर्धनाची जबाबदारी देण्यात आली. त्यासाठी भारत सरकार स्कूल शिक्षा आणि साक्षरता विभाग मार्फत इको क्लब द्वारा ऑनलाईन प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक पी डी पाटील, उपशिक्षक एस.पी.बऱ्हाटे, एन एम. राजपूत,व्ही.जी. पाटील, दीपक राजपूत,पवन पाटील,स्वाती गुजराथी,जे.आर.पाटील शाळेचे लिपिक मंगेश दीक्षित,कर्मचारी प्रवीण भामरे यांनी सर्वांनी मेहनतीने सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.