अडावद येथे श्री संत सावता महाराज संजीवन सोहळा साजरा : टाळ मृदुंगाच्या नादात गावभर निघाली पालखी
अडावद दि.२६(प्रतिनिधी) :येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन सोहळ्यानिमित्त पालखी सोहळा आयोजित करण्यात आला. यात शाळेतील विद्यार्थी, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. टाळ मृदुंगाच्या तालावर भजन गात संत सावता महाराज यांची पालखी गावभर मिरवण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला.
२३ रोजी सकाळी आठ वाजता श्री संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. सर्वप्रथम मंदिरात आरती करण्यात आली. नंतर संत सावता महाराज यांची प्रतिम ठेवलेली पालखी पूजन करण्यात आले. शामराव येसो महाजन विद्यालयातील विद्यार्थ्यांचे लेझिम पथक, आदर्श प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, शामराव येसो महाजन विद्यालयातील विद्यार्थी, शाळा व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एका पालखी संत सावता महाराज यांची प्रतिमा व विविध वृक्षांची रोपे ठेवलेली पालखी, सोबत विद्यार्थ्यांनी हातात रोप घेऊन संताचा जयघोष करीत त्यांनी दिलेल्या 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ' या संदेशाची आठवण करून देत ' वृक्ष लावा पृथ्वी वाचवा ' ' एक पेड माँ के नाम ' अशा घोषणा देत वृक्षदिंडी काढली. त्यामागे महिला मंडळांचे अध्यक्षा व सर्व सदस्या, ग्रामस्थ भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर पालखी संत सावता महाराज मंदिर, सुभाष चौक, श्रीराम मंदिर, महात्मा फुले रोड, राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक, ग्रामपंचायत गल्ली, विघ्नहर्ता चौक, विठ्ठल मंदिर, शिंपी गल्ली, महर्षि वाल्मीक चौक, दुर्गा देवी चौक, मधला माळी वाडा मार्गे मंदिरापर्यंत मिरवण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला.
या पालखी सोहळ्यात अध्यक्ष हनुमंत महाजन, सचिव एस. जी. महाजन, ग्राम पंचायत सदस्य पंकज महाजन, श्री संत सावता माळी शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भगवान महाजन, उपाध्यक्ष वासुदेव महाजन, सचिव रमेश पवार महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष साखरलाल महाजन, माजी सरपंच भारतीताई सचिन महाजन, माजी लोकनियुक्त सरपंच भावनाताई पंढरीनाथ माळी, विकासो संचालक सचिन महाजन, प्रकाश महाजन, प्रभाकर महाजन, वरचा माळी वाडा संजय महाजन, खालचा माळी वाडा अध्यक्ष नारायण महाजन, पीक संरक्षण संस्थेचे संचालक संजय महाजन, शिवदास महाजन, देवानंद महाजन, सुदाम महाजन, संजय पवार, ग्रामपंचायत सदस्य संदीप महाजन, रवींद्र महाजन, दत्तात्रय महाजन, पंढरीनाथ महाजन, सुधाकर महाजन, मुरलीधर महाजन, खालचा माळी वाडा महिला मंडळ अध्यक्षा रत्नाताई विठोबा महाजन, मधला माळी वाडा महिला मंडळ अध्यक्षा अनिताताई प्रकाश माळी, वरचा माळी वाडा महिला मंडळ अध्यक्षा आशाताई सजन महाजन, तसेच तिन्ही वाड्यातील पंच मंडळ समाज बांधव, माता भगिनी, तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जागेश्वर भजनी मंडळाचे आबा महाजन, संजय शेलकर, राजेंद्र महाजन, संजय महाजन, सुधाकर महाजन, संजय बैरागी, रवींद्र महाजन, गणेश महाजन, ईश्वर महाजन, बाळा महाजन, सुनील महाजन, अशोक महाजन यांनी तसेच श्रीहरी बँडचे प्रवीण महाजन यांनी सुरेल आवाजात टाळ मृदुंगाच्या नादात भजने गायली.
तसेच वनविभागाचे वनपाल योगेश साळुंखे, पांढरी वनरक्षक नवल चव्हाण, उनपदेव वनरक्षक रुपेश तायडे, वनमजूर दशरथ पाटील, वनमजूर संजय माळी, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात सर्व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.