अखिल भारतीय समरथ जैन श्रावक संघ मालेगावच्यावतीने गरीब विद्यार्थ्यांना कपडे वाटप ♦️ गरीब, गरजवंत विद्यार्थ्यांना स्व पायावर उभे राहण्यासाठी मदतीचा हात दिल्यास मानव खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य होणार..महामंत्री श्री.प्रदीपभाई बरडिया यांचे मत

 अखिल भारतीय समरथ जैन श्रावक संघ मालेगावच्यावतीने गरीब विद्यार्थ्यांना कपडे वाटप

♦️ गरीब, गरजवंत विद्यार्थ्यांना स्व पायावर उभे राहण्यासाठी मदतीचा हात दिल्यास मानव खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य होणार..महामंत्री श्री.प्रदीपभाई बरडिया  यांचे मत 

 चोपडा दि.१५(प्रतिनिधी) : श्री अखिल भारतीय समरथ जैन श्रावक संघ मालेगाव यांच्यावतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे  औचित्य साधत गरीब आदिवासी विद्यार्थी  व विद्यार्थीनींना कपडे  वाटपाचा कार्यक्रम कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वस्तीगृह आणि सातपुडा आदिजनता मुलांचे वसतिगृहात पार पडला.

स्वातंत्र्य मिळूनही देशात अनेक जण अन्न ,वस्त्र व निवाऱ्यापासून वंचित आहे यातच आदिवासी गोरगरीब विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षण घेत असून त्यांच्या अंगावर नीटनेटके  वस्त्र ही राहत नाही ही  बाब मन अस्वस्थ करणारी असते हा दूरगामी  विचार करीत अखिल भारतीय समरथ जैन श्रावक संघाचे महामंत्री व दातृत्वशाली व्यक्तीमत्व श्री प्रदीपभाई बरडिया यांनी   १०० गरजवंत आदिवासी विद्यार्थ्यांना वस्त्र दान करून मोलाचा हात दिला आहे.

सध्याच्या युगात  झेंड्याला सलाम करून  स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासोबत  उत्तम शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर मदतीचा थाप देणेही आवश्यक आहे.म्हणून खऱ्या गरजूंना योग्य ती मदत देऊन पुढे आणण्याचे काम करणे आज अत्यंत गरजेचे  असून त्यातच खरा मानवार्थ सामावलेला आहे. "मानव सेवा हीच ईश्वर सेवा" असल्याने  ज्याकडे आहे त्यानं काही तरी देण्याची भावना ठेवल्यास गरिब आपल्या पायावर उभा राहिल असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

 याप्रसंगी महाराष्ट्र शाखा नव युवक मंडळाचे अध्यक्ष श्री निखिलजी बरडिया, कार्यकारणी सदस्य श्री डॉ. रामलालजी बोरा, श्री संजयजी बरडिया, महाराष्ट्र शाखा कार्यकारणी सदस्य नितीनजी बरडिया, कमला नेहरू मुलींचे वस्तीगृह अध्यक्ष महेश शिरसाठ,अधिक्षिका कावेरी कोळी, सातपुडा आदि जनता वस्तीगृह अध्यक्ष संजय शिरसाठ, कर्मचारी वर्ग व विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने