आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या शब्दाला मान देत सागर ओतारी यांचे उपोषण स्थगित

 आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या  शब्दाला मान देत  सागर ओतारी यांचे उपोषण स्थगित 

चोपडा दि.१८(प्रतिनिधी)दी जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेने केलेल्या फसवणुकीच्या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल होता नसल्यामुळे सागर ओतारी यांनी चोपडा शहर पोलिस स्टेशन समोर सुरू असलेले आमरण अन्नत्याग उपोषण पाचव्या दिवशी तालुक्याचे आमदार प्रा .चंद्रकांत सोनवणे व तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या शब्दाला मान देऊन तात्पुरते स्थगित केले.

14 ऑगस्ट 2025 तारखे पासून चोपडा शहर पोलीस स्टेशन समोर सुरू असलेले अन्नत्याग उपोषणाला नागरिक व कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा मिळत होता. शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी यांनी देखील उपोषणकर्ते यांना मोठा पाठिंबा दिलेला होता चोपडा शहर व तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना आणि तालुक्यातील नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला उपोषण हे लोकशाही मार्गाने शांततापूर्ण वातावरणात सुरु होते उपोषणकर्ते सागर ओतारी यांची पाचव्या दिवशी देखील कुठल्याही अधिकाऱ्याने उपोषणा स्थळी भेट दिली नव्हती तालुक्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली.त्यानंतर उपोषणकर्त्यांनी आमदारांच्या शब्दाचा मान ठेवत ज्यूस घेऊन उपोषण सोडले.

 उपोषणाच्या पाचव्या दिवशी सागर ओतारी यांची तब्येत खालावली होती डॉक्टरांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याचे सांगितले होते परंतु जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत कोणतीच ट्रीटमेंट घेणार नाही असे सागर ओतारी यांनी सांगितले होते मात्र आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या आणि तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी उपोषण हे तात्पुरते स्थगित केले आहे याच्यानंतर न्यायालयात जाऊ असे  सागर ओतारी यांनी सांगितले. तसेच पुढील उपोषण   हे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे करण्यात येईल इशारा दिला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने