राष्ट्रभक्तीपर समूहगायन स्पर्धेत प्रताप विद्या मंदिराचा प्रथम क्रमांक
चोपडा दि.१८(प्रतिनिधी):-विद्यार्थ्यांच्या मनावर राष्ट्रसेवा, राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेमाचे संस्कार रुजवण्यासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम ते घेत असतात त्याच अनुषंगाने रोटा किड्स च्या माध्यमातून राष्ट्रभक्तीपर समूह गायन स्पर्धा दरवर्षी सालाबादप्रमाणे आयोजित करीत असतात त्यामध्ये चोपडा तालुका तसेच शहर मधील अनेक शाळा या स्पर्धेला सहभागी होत असतात ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडते मुलांना संगीत विषयात पारंगत करण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत यामध्ये पहिली ते चौथी वंदे मातरम गटातून प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा प्रथम क्रमांक व पाचवी ते सातवी सत्यम गटातून तृतीय क्रमांकतसेच सुंदरम गटातून शिक्षणशास्त्र विभाग डीएड बीएड विभाग प्रताप विद्यामंदिर तृतीय क्रमांक प्राप्त करत घवघवीत यश संपादन केले. हे यश संपादन करण्यामागे संगीत शिक्षक राजपूत सर यांनी उत्तम मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले तसेच प्रताप विद्यामंदिर माध्यमिक विभाग इयत्ता आठवी ते दहावी गटात दुसरा क्रमांक पटकावला. या गटास संगीत शिक्षक श्री पी. बी. कोळी सर यांनी उत्तम मार्गदर्शन केले. त्यासाठी चोपडा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.सौ. शैलाबेन मयुरजी, चेअरमन राजाभाई मयूर उपाध्यक्ष- मा. विश्वनाथभाई अग्रवाल, सचिव - मा.माधुरी ताई मयुर,पीपल्स को-ऑपरेटिव बँक चेअरमन मा. चंद्रहासभाई गुजराथी, मा.भूपेंद्रभाई गुजराथी मा.रमेशभाई जैन मा.किरणभाई गुजराथी, प्रा. आर.बी गुजराथी सर,प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक रजिश बलन, उपमुख्याध्यापक निखिला रजिश व प्रताप विद्यामंदिर माध्यमिक विभाग चे मुख्याध्यापक श्री. पी .एस. गुजराथी सर, उपमुख्याध्यापिका श्रीमती माधुरी पाटील मॅडम पर्यवेक्षक श्री भट सर, श्री करमरकर सर, श्री नागपुरे सर मा.गोविंद गुजराथी सर, तसेच विद्यार्थ्यांची टीम व आदरणीय पालक वर्ग,या सर्व वर्गांचे वर्गशिक्षक यांचे खूप खूप अभिनंदन व कौतुक पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात...