लासुरला पोलीस दुर क्षेत्र स्वतंत्र इमारत बांधकाम करण्याची मागणी
चोपडादि.१९(प्रतिनिधी) तालुक्यातील लासूर येथे अवैध धंद्यावर आडा बसावा यासाठी चोपडा ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस दुरक्षेत्र मंजूर करून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर ग्राम पंचायत च्या अंगणवाडी च्या इमारतीत जागा देवून पोलीस दुरक्षेत्र सुरू करण्यात आले. परंतु कालांतराने ती इमारत आता पावसाळ्यात गळते. म्हणून तेथे पोलीस कर्मचार्यांना थांबणे ही जिकरीचे होते. म्हणून ग्राम पंचायत किंवा लोकप्रतिनिधी यांनी जातीने लक्ष घालून लासूर येथील वन विभागाच्या जागा शेजारी पोलीस दुरक्षेत्र साठी इंग्रज काळापासून राखीव ठेवण्यात आली आहे. परंतु त्या ठिकाणी इतर लोकांचा रस्ता नसून देखील वहिवाटी साठी रस्ता तयार करून हक्क दाखवत आहे. म्हणून तात्काळ त्या जागेवर पोलीस दुरक्षेत्र साठी नव्याने इमारत बांधकाम करून प्रशस्त असे पोलीस दुरक्षेत्र बांधकाम करावे. अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान लासूर या गावापासून मध्य प्रदेश ची सिमा जवळ असल्यामुळे साहजिकच गावठी कट्टा, गांजा, स्पिरिट, नकली देशी विदेशी दारू या सारख्या अंमली पदार्थाची तस्करी मोठ्या प्रमाणावर दिवसा-रात्री होत असते. म्हणून नव्याने जर प्रशस्त इमारत बांधली तर या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस थांबतील