प्रताप प्राथमिक विद्या मंदिरात इ 3 री च्या विद्यार्थांसाठी माजी सैनिकांची मुलाखत

 प्रताप प्राथमिक विद्या मंदिरात इ 3 री च्या विद्यार्थांसाठी माजी सैनिकांची मुलाखत

फलक लेखन : श्री. अभिषेक शुक्ल सर ,फोटो सौजन्य : श्री. दीपक बाविस्कर सर

चोपडा दि.२२(प्रतिनिधी)काल दिनांक 21 ऑगस्ट 2025 वार गुरुवार रोजी प्रशालेत स्फूर्तीदायक, चैतन्यमय असा कार्यक्रम पार पडला. इयत्ता तिसरी मराठी पाठ्यपुस्तकातील ‘ते अमर हुतात्मे झाले !’ या कवितेवर आधारित *माजी सैनिकांची मुलाखत* या उपक्रमांतर्गत माजी सैनिक श्री. महेंद्र लक्ष्मण मगरे (युनिट 23, मराठा बटालियन हवालदार) यांना आमंत्रित करण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. सुनील पाटील सरांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. प्रसंगी प्रशालेतील श्री. पी.पी. पाटील भाऊसाहेब, इयत्ता तिसरीचे वर्गशिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. 

               तदनंतर विद्यार्थ्यांनी आपापल्या मनातील कुतूहलपर प्रश्न विचारून आलेल्या माजी सैनिकांची मुलाखत घेतली. मुलाखतप्रसंगी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन आपल्या जीवनातील अविस्मरणीय अनुभव माजी सैनिक श्री. महेंद्र मगरे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रम यशस्वीते साठी उपशिक्षक दीपक बाविस्कर,दिपाली पाटील व अभिषेक शुक्ल यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रभावि सूत्रसंचालन श्रीमती दिपाली पाटील मॅडम यांनी केले. 



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने