चोपडा समाजकार्य महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली तंबाखू मुक्तीची शपथ

 

चोपडा समाजकार्य महाविद्यालयात  विद्यार्थ्यांनी घेतली तंबाखू मुक्तीची शपथ

चोपडादि.२२(प्रतिनिधी) येथील समाजकार्य महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागामार्फत नशा मुक्तीची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. तंबाखू गुटखा व नशायुक्त पदार्थांच्या सेवनामुळे  विविध आजारांना आमंत्रण दिले जाते तसेच कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराची लागण होते ते टाळण्यासाठी तरुण वर्गाने पुढे आले पाहिजे असे मार्गदर्शनही यावेळी देण्यात आले.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत हा उपक्रम  विद्यार्थी विकास विभागामार्फत राबविण्यात आला.तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन व त्यामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ईश्वर सौंदाणकर,उपप्राचार्य डॉ. आशिष गुजराथी, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.नारसिंग वळवी व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने