लासूर येथे बैल पोळा उत्साहात साजरा
लासुर,ता.चोपडा,दि.२२(प्रतिनिधी) चोपडा तालुक्यातील लासूर येथे बैल पोळा निमित्ताने शेतकरी बंधूंनी बैलांना साजशृंगार करून जागेवर पुजा औक्षण करून गोड नैवेद्य खाऊ घातले.महाशय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार लंपी आजाराच्या प्रादुर्भाव लक्षात घेता बैलांना संसर्ग होणार नाही याची काळजी म्हणून गावात एका बैलजोडीचे स्वागत पो. पा. जितेंद्र पाटील यांनी केले.
यावेळी किसान विद्या प्रसारक मंडळाचे संचालक दीपक रतन महाजन माजी सैनिक किशोर चौधरी, विविध का. सोसायटी माजी संचालक सुभाष निंबा माळी, महेंद्र माळी,, अमोल गंभीर, माजी सरपंच देवीलाल बाविस्कर, वासुदेव सोनार, सागर महाजन,शेतकरी महेंद्र देविदास शेलकर, व बंदोबस्त वर आलेले ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते.