समाजकार्य महाविद्यालयाची अवयवदान रॅली उत्साहात संपन्न
चोपडा दि.२०(प्रतिनिधी)भगिनी मंडळ चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथील ,"राष्ट्रीय सेवा योजना" विभाग आणि कॉलेज ऑफ नर्सिंग, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने "अवयवदान जनजागृती" या विषयावर चोपडा शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. "अवयवदान हेच जीवनदान आहे". याविषयी विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या. आजच्या काळातील अवयवदानाचे महत्व याविषयी जनजागृती व्हावी याकरीता हि रॅली चोपडा शहरात काढण्यात आली होती.
"समाजकार्य पंधरवडा" यानिमित्तानेही सदर "अवयवदान जनजागृती" रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी या रॅलीमध्ये घोषणा दिल्या.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. संबोधी देशपांडे आणि सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. उत्तम सोनकांबळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भगिनी मंडळ संचालित समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर, उपप्राचार्य प्रा. डॉ. आशिष गुजराथी, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, यांचे सहकार्य लाभले.