बी. फार्मसी चोपडा महाविद्यालयाच्या बोटॅनिकल सहलीचे उनपदेव येथे उत्साहात आयोजन
चोपडा दि.१४(प्रतिनिधी)महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, चोपडा या महाविद्यालयाच्या बोटॅनिकल सहलीचे उनपदेव येथे दिनांक 13 ऑगस्ट 2025 या रोजी यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले.
या महाविद्यालयाची स्थापना 1992 या वर्षापासून झालेली आहे. चोपडा तालुक्यातील औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय हे NAAC व ISO (आयएसओ) प्रमाणित महाविद्यालय आहे.
येथे बी. फार्म अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेश क्षमता 100 जागांची आहे तसेच एम. फार्म फार्माकॉगनोसी, एम. फार्म. फार्मास्युटिक्स व एम. फार्म. क्वालिटी अशुरन्स (Quality Assurance) पदव्युतर पदवी अभ्यासक्रम सुरू आहेत. पीएच.डी. अभ्यासक्रम पण महाविद्यालयात घेतला जातो. वर्ष 2020 यावर्षीपासून डी.फार्म हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे.
महाविद्यालयाच्या फार्माकॉगनोसी या विभागातर्फे प्राचार्य डॉ. गौतम पी. वडनेरे यांच्या मार्गदर्शनानुसार उनपदेव येथे दिनांक 13 ऑगस्ट 2025 या रोजी बोटॅनिकल सहलीचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. सहलीचे उदघाटन माननीय प्राचार्य डॉक्टर गौतम पी. वडनेरे यांच्या हस्ते करण्यात आले. तृतीय वर्ष बी. फार्म या वर्गाचे सर्व विद्यार्थी सहलीला उपस्थित होते
उनपदेव येथे औषधी वनस्पतींची सविस्तर माहिती वनरक्षक श्री. दशरथ पाटील यांनी दिली. विद्यार्थ्यांना या सहलीत आरोग्यविषयक फायदे असलेल्या औषधी वनस्पतींची माहिती दिली जाते. मग हे विद्यार्थी वनस्पतींचे नमुने गोळा करतात आणि हर्बेरियम पत्रक तयार करतात जे नंतर एकत्रितपणे वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. आर.एम.बागूल सर यांच्या कडून प्रमाणित करून घेतले जाते. हर्बेरियम पत्रकात वनस्पतींची सविस्तर माहिती विद्यार्थी लिहितात आणि मिळालेल्या व प्रत्यक्ष पाहिलेल्या औषधी वनस्पतींच्या माहितीचा विद्यार्थ्यांना संशोधन व अभ्यासक्रमात उपयोग होतो.
विभागप्रमुख प्रा. डॉ. एम.डी. रागीब यांनी महाविद्यालयाच्या वतीने वनक्षेत्रपाल श्री प्रशांत साबळे, वनपाल श्री. योगेश साळुंखे, वनश्री श्री. दशरथ पाटील, वनरक्षक रुपेश तायडे, श्री गजानन कोईगडे यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले.
उपस्थित प्राध्यापक डॉ. एम. डी. रागीब, प्रा.डॉ. सुवर्णलता एस.महाजन, प्रा.सौ. कांचन पाटिल, प्रा. भूषण पाटील, प्रा. अल्फेज कुरेशी तसेच उपस्थित शिक्षकेतर कर्मचारी श्री. धनंजय सावंत, श्री. जितेंद्र परदेशी, श्री. उमंग सोनवणे व अजय सोनवणे यांच्या सहकार्याने सहल यशस्वीरित्या पार पडली.
संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब अॅड.संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्ष माननीय श्रीमती आशाताई पाटील आणि सचिव माननीय ताईसाहेब डॉ. स्मिता संदिप पाटील, प्राचार्य डॉ. गौतम पी. वडनेरे, रजिस्ट्रार श्री. पी. बी. मोरे व तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर वर्गाचे सहलीसाठी सहकार्य लाभले.