लासुरला पोनि महेश टाक यांची भेट.. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

 लासुरला पोनि महेश टाक यांची भेट.. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन 

चोपडा,दि.१४(प्रतिनिधी):- लासूर येथे चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे नव्याने रूजू झालेले पोलीस निरीक्षक महेश टाक यांनी नुकतीच भेट दिली असता गावातील सर्वच गणपती मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभासद यांची बैठक घेवून एक गाव एक गणपतीची संकल्पना मांडली. परंतु गावातील गणेश भक्तांचे बँंड, ढोलताशे आदि वाजंत्री वाल्यांना आगाऊ तारीख दिल्यामुळे तरूणांनी आपली व्यथा पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या लक्षात आणून दिले. म्हणून यावर्षी तरी गावातील सर्व गणेश मंडळांना वेगवेगळ्या ठिकाणी श्रींची स्थापना करण्याची परवानगी दिली व विशेष बाब म्हणजे रात्री १२ वाजेपर्यंत शांतेत श्रींची विसर्जन मिरवणूक काढण्याची अनुमती दिली. म्हणून गावातील सर्वच गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. 

याप्रसंगी सरपंच जनाबाई भिल्ल, उपसरपंच अनिल पाटील, पोलीस पाटील जितेंद्र पोलीस, लासूर बिटचे हवालदार शशिकांत पारधी, सुनील कोळी, विजय पाटील, विकास वाघ, देवीलाल बाविस्कर, दिलीप पालीवाल,हभप छोटू महाराज, गोकूळ महाजन, अशोक पाटील, शकील शहा, मुश्ताक पठाण, वना भिल्ल, सुनिल कोळी, विक्रम महाजन वाल्मिक पाटील,यांच्या सह गावातील नागरिक व गणेश मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने