समाजकार्य महाविद्यालयात राष्ट्रीय पुस्तक प्रेमी दिवस साजरा

 समाजकार्य महाविद्यालयात राष्ट्रीय पुस्तक प्रेमी दिवस साजरा

चोपडा दि.१३(प्रतिनिधी)भगिनी मंडळ चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय येथे समाजकार्य पंधरवडा निमित्त   12 ऑगस्ट 2025 रोजी भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस आर रंगनाथन यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त  ग्रंथालयात प्रतिमापूजन आणि ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच महाविद्यालयातील ग्रंथांची विद्यार्थ्यांनि माहिती करून लाभ घ्यावा व जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त करावेया करिता करिता माननीय भाईसाहेब श्री.अरुण भाई गुजराथी यांचे कडून देणगी मध्ये मोठ्या प्रमाणात मिळालेल्या विविध सामाजिक,काव्यात्मक, चरित्रात्मक , तत्त्वज्ञान पर, धार्मिक , प्रवास वर्णन इत्यादी पुस्तकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते त्याला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी येऊन  ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली व पुस्तकांचे वाचन देखील केले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आय एम सौंदाणकर,उपप्राचार्य डॉ. आशिष गुजराथी तसेच ग्रंथालय सल्लागार समितीचे सदस्य डॉ.विनोद रायपुरे,डॉ. देशपांडे,प्रा. वळवी आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने