जिद्द, चिकाटी, कष्ट यशाची त्रिसूत्री बनू शकते - माधुरी मयूर ♦️प्रताप विद्या मंदिरातील गुणवंतांचा गौरव सोहळा संपन्न

 जिद्द, चिकाटी, कष्ट यशाची त्रिसूत्री बनू शकते - माधुरी मयूर

♦️प्रताप विद्या मंदिरातील गुणवंतांचा गौरव सोहळा संपन्न 



चोपडा,दि.१४(प्रतिनिधी) चोपडा एज्युकेशन सोसायटी चोपडा संचलित प्रताप विद्या मंदिरात 2024-25 या शैक्षणिक वर्षात इ.10 वी व इ. 12 वी तील तसेच विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

    यावेळी चोपडा एज्युकेशन सोसायटीच्या सचिव माधुरी मयूर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांसमोर सांगितले की आपल्या कार्यात माघार न घेता अडचणींवर मात करून निरंतर प्रयत्न सुरू ठेवल्याने यश प्राप्ती होते. करिअरची सुंदर व्याख्या विद्यार्थ्यांसमोर देताना उज्वल भविष्याच्या राजमार्ग त्यांनी उलगडला. सोबतच त्यांनी सुंदर व मार्मिक उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना उद्बोधन केले.

       यावेळी मंचावर संस्थेचे उपाध्यक्ष  विश्वनाथकाका अग्रवाल , सचिव माधुरीताई मयूर , कार्यकारणी सदस्य  भूपेंद्रभाई गुजराथी , रमेशकाका जैन,  किरणभाई गुजराथी तसेच मुख्याध्यापक पी एस गुजराथी , उपमुख्याध्यापिका माधुरी पाटील मॅडम , ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य  एस शेलार तसेच संस्थेचे समन्वयक गोविंदभाई गुजराथी आदी उपस्थित होते.

         विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात इ. 10 वीचे 45 विद्यार्थी तसेच इ. 12 वी च्या सर्व शाखा मिळून 10 विद्यार्थी व नीट परीक्षा, जेईई परिक्षा, सीईटी परीक्षेतील उत्तीर्ण एकूण 12 विद्यार्थी तसेच स्कॉलरशिप मधील इ. 5 वीतील 5 विद्यार्थी तर इ. 8 वीतील 6 विद्यार्थी या विद्यार्थ्यांनी जिल्हा तसेच तालुका गुणवत्ता यादीत यश संपादन केल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.

       या कार्यक्रमाच्या वेळी पर्यवेक्षक ए एन भट,  एस व्ही करमरकर , पी ए नागपुरे तसेच सर्व गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक , शिक्षक बंधू भगिनी लेखनिक कर्मचारी आदी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय ए बोरसे यांनी केले तर आभार उपमुख्याध्यापिका माधुरी पाटील यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने