बुधगावचे उर्वेश साळुंखे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ग्रामीण तालुका अध्यक्षपदी निवड

बुधगावचे उर्वेश साळुंखे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ग्रामीण तालुका अध्यक्षपदी निवड

 चोपडा दि.१४(प्रतिनिधी) तालुक्यातील बुधगाव येथील  उर्वेश लक्ष्मण साळुंखे यांची माजी मदत पुनर्वसन मंत्री आमदार अनिलदादा पाटील व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांच्या हस्ते राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चोपडा ग्रामीण तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या प्रसंगी जिल्हाअध्यक्ष राकेश सोनार, अँड देवकद पाटील,नानाभाऊ सोनवणे, भूपेंद्र पवार, हर्षल साळुंखे आदी उपस्थित होते.

   आपण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रांतअध्यक्ष सुनील तटकरे यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी प्रयत्नशील राहील व पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची ध्येय धोरण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाला आपले सहकार्य राहील असा विश्वास नवनियुक्त अध्यक्ष उर्वेश साळुंखे यांनी व्यक्त केला.  या निवडी बद्दल तालुक्याच्या व जिल्ह्याच्या सर्व पद अधिकारी यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने