भाजप अनुसूचित जनजाती मोर्चा नवीन नाशिक मंडळाच्या अध्यक्षपदी युवराज सैंदाणे
नाशिक दि.१४(प्रतिनिधी): भाजप नाशिक महानगर जिल्हा नवीन नाशिक मंडलाची कार्यकारिणी मंडल अध्यक्ष डॉ. वैभव महाले यांनी घोषीत केली. भाजप नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष श्री सुनील केदार यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली. सदर कार्यकारिणी प्रदेश भाजपाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार भाजप नाशिक महानगर नवीन नाशिक मंडल अध्यक्ष डॉ.वैभव महाले यांनी भाजप नाशिक महानगर नवीन नाशिक अनुसूचित जनजाती (एसटी, आदिवासी आघाडी) मोर्चाच्या अध्यक्षपदी आदिवासी कोळी जमात बहुउद्देशीय डेव्हलपमेंड फाउंडेशनचे संस्थापक तथा कोळी महासंघाचे नाशिक शहर अध्यक्ष युवराज सैंदाणे यांना घोषीत करण्यात आली.
भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी, उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, आमदार सीमाताई हिरे, आमदार देवयानीताई फरांदे, आमदार राहुल ढिकले, लक्ष्मण सावजी, प्रतिक पेशकार, गोविंद बोरसे, बाळासाहेब सानप, विजय साने, महेश हिरे, सतीश कुलकर्णी, प्रशांत जाधव, गिरीश पालवे, यांच्या मार्गदर्शनाने आणि भाजप नाशिक शहर सरचिटणीस काशिनाथ शिलेदार, ॲड. श्याम बडोदे, हीमगौरी (आहेर) आडके, रोहिणी (नायडू) वानखेडे, महानगर मंडल अध्यक्ष, पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी तसेच कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा विधानपरिषदेचे माजी आमदार रमेशदादा पाटील, कोळी महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा पत्रकार राजहंस टपके, भाजप मच्छीमार सेलचे प्रदेशाध्यक्ष तथा कोळी महासंघाचे युवाप्रदेशाध्यक्ष ॲड. चेतनदादा पाटील, कोळी महासंघाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष गुलाब गांगोडे तसेच कोळी महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले.
भाजप नेतृत्वाने जो माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, आज पर्यंत समाजाच्या संघटनेच्या अध्यक्षाच्या माध्यमातून आणि भाजप पक्षाच्या माध्यमातून बरेच समाजाभिमुख कामे केली आहेत, आता सर्वांच्या सहकाऱ्याने अध्यक्ष पदाचे काटेरी मुकूट घेऊन सर्वांना सोबत घेऊन येणाऱ्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन.