चोपडाओम शांती केंद्रातर्फे विद्यार्थींनींना बांधल्या राख्या.. मंगला दिदींच्या आदर्श विचाराने शिक्षणासाठी रक्षाबंधनापासून दूर राहणाऱ्या बहिणींच्या चेहऱ्यावर हास्य
चोपडा दि.१८(प्रतिनिधी)चोपडा येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वर विद्यालय ओम शांती केंद्रातर्फे कमला नेहरू मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधण्याचा कार्यक्रम केंद्राच्या संचालिका मंगला दीदी यांच्या शुभहस्ते नुकताच पार पडला.शिवाय रक्षाबंधनाचे महत्त्व विशद करून माईंड अॅक्टीव्हिजचे मार्गदर्शन करण्यात येऊन ब्रम्ह भोजन देण्यात आले.शिक्षणासाठी आपल्या परिवारापासून दूर राहणाऱ्या बहिणीं रक्षाबंधनाकरिता आतुन दुखावलेल्या असतात ती उणीव क्षणीक का होईना दूर होऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलावा या विशाल विचाराने हा उपक्रम केंद्राने घडून आणला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विवेकानंद विद्यालयाचे शिक्षक घनश्याम पाटील यांनी ओम व शांती या शब्दांच्या अर्थ समजावून सांगितला. त्यानंतर शितल दीदी यांनी शैक्षणिक जीवनात व क्षेत्रात मेडिटेशनचा कसा उपयोग होतो व आपली बुद्धिमत्ता कशी वाढवता येईल यावर मार्गदर्शन केले. मंगला दीदी यांच्या शुभ हस्ते सर्व विद्यार्थिनीं व स्टॉफला राखी बांधण्यात आली . यावेळी सारिका दीदी, शीतल दीदी, करिश्मा दीदी, घनश्याम पाटील, वस्तीगृह अध्यक्ष महेश शिरसाठ अधीक्षिका कावेरी कोळी, शुभम साळुंखे व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.