हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती चोपड्यात धुमधडाक्यात साजरी .. शेती अवजारे हातात घेऊन डी.जे.च्या तालावर नाचत बळीराजाची अनोखी दिंडी

 हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती  चोपड्यात धुमधडाक्यात साजरी .. शेती अवजारे हातात घेऊन डी.जे.च्या तालावर नाचत बळीराजाची अनोखी दिंडी 

चोपडा दि.१(प्रतिनिधी) :हरितक्रांतीचे जनक आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, यांची जयंती कृषी दिन म्हणून सर्वत्र साजरी होत असताना शहरात देखील उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली . "शेती ही आपली जीवनरेषा" या संदेशासह, शेत साहित्य व नैसर्गिक शेतीचे मॉडेल्स घेऊन दिंडी निघाली शेतकरी बांधवांनी डीजे च्या तालावर घेर धरून नाचत आनंदोत्सव साजरा केला.भारत हा कृषी प्रधान देश असल्याने जगाच्या पोशिंद्याचा सन्मान सर्व नागरिकांनी काना कोपऱ्यातून होऊन  देशात नंबर एकचा उत्सव म्हणून साजरा झाला पाहिजे असे परखड मत  शेतकरी बांधवांनी  यावेळी व्यक्त केले.शेतकऱ्यांनी आपापल्या पारंपरिक पोषाखात सहभाग घेऊन कृषी संस्कृतीचे दर्शन घडवले. जय जवान जय किसान चा नारा देत दिंडी काढण्यात आली.

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती मधून सकाळी साडेआठ वाजता निघालेल्या या कृषी दिंडीला तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पेरणीची पांभर, औत, बैलगाडी जोडी, विविध कृषी अवजारे, फवारणी पंप, आदी साहित्य, तालुक्यातील शेतकऱ्यांनी सजवून आणले होते. महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष, अरुणभाई गुजराथी, उद्योजक वसंत गुजराती, डॉ. रवींद्र निकम, आडगाव येथील शेतकरी अंबादास पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ॲड .घनश्याम पाटील, संचालक नंदकुमार पाटील, शेतकरी नेते, एस बी.नाना पाटील, सूतगिरणीच्या संचालक, रमेश हिम्मतराव पाटील, जिल्हा कृषी अधिकारी तडवी, तालुका कृषी अधिकारी साळुंखे, पाणी आडवा पाणी जिरवा या योजनेची यशस्वी अंमलबजावणी करणारे श्रीराम तेले, कवी रमेश पाटील, आडगाव चे माजी सरपंच रावसाहेब पाटील, हुकुमचंद पाटील, चहार्डी येथील चंद्रकांत हरी पाटील, प्रकाश पाटील (बिडगाव) आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

शेतकऱ्यांना जय जवान जय किसान नावे लिहिलेल्या टोप्यांचे वाटप करण्यात आले. कृषीदिंडीत अनेक शेतकरी डीजे च्या तालावर घेर धरून नाचत होते. पडत्या पावसात शिवरायांच्या पुतळ्याला हार घालून नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सभेचा समारोप नाट्यगृहात करण्यात आला. तत्पूर्वी, छत्रपती शिवाजी महाराज चौकात, कस्तुरबा शाळेच्या विद्यार्थिनींनी व विद्यार्थ्यांनी शेतकरी गीत गाऊन नृत्य करून शेतकऱ्यांची प्रशंसा मिळवली. एस एल पाटील मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली हे गीत सादर करण्यात आले. मनोगतात त्यांनी या कृषी दिंडीला सदिच्छा व्यक्त केल्या. व शालेय विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शरद चंद्रिका अक्का पाटील, नाट्यगृहात शेतकऱ्यांना यावेळी विठ्ठल एप्रो, तालुका कृषी अधिकारी, व पेस्टिसाइड संघटनेच्या वतीने बक्षिसे वाटप करण्यात आले. व्यासपीठावर अरुण भाई गुजराती, नंदकिशोर पाटील, सुनील पाटील, एसबी नाना पाटील, डॉ. रवींद्र निकम, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे, डॉ.सुभाष देसाई व मान्यवर उपस्थित होते.




Post a Comment

थोडे नवीन जरा जुने