आला आला वारा संग पावसाच्या धारा..चला जाऊ या चौगांवला..
चौगाव दि.१ (प्रतिनिधी) : पावसाळा सुरू झाला की अनेक पर्यटक व निसर्गप्रेमींना वेड लागतं ते गडकोट आणि पर्यटन स्थळांचं...! अशातच त्यांना एक आठवतंय ते म्हणजे चोपडा तालुक्यातील चौगावचा किल्ला, तिर्थक्षेत्र त्रिवेणी महादेव मंदिर चौगाव आणि हो किल्याच्या बाजूलाच जळगाव जिल्ह्यातील सर्वात उंच धबधबा जो आता ओसांडून वाहू लागला आहे.चोपडा पासुन बारा किलोमीटर अंतरावर असलेले चौगाव आणि तेथून अवघ्या चार किलोमीटर अंतरावरील चौगावचा किल्ला, त्रिवेणी संगम व धबधबा.सध्या या ठिकाणी रोज शेकडो पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते.चला तर मग आपणही भेट देऊ या..!