चोपडा महाविद्यालयात YCMOU च्या विद्यार्थ्यांच्या वारसास डॉ. स्मिता पाटील यांच्या हस्ते दीड लाखाचा अपघाती विमाचा धनादेश वितरीत
चोपडा दि.१९(प्रतिनिधी)चोपडा येथील दादासाहेब डॉ सुरेश जी पाटील महाविद्यालयाचा YCMOU एम.ए मराठी.चा विद्यार्थी निलेश सदाशिव बारेला या विद्यार्थ्याचे अपघाती निधन झाले होते विद्यार्थ्याचा वारसास कविता निलेश बारेला यांना म.गां.शि.मंडळाच्या सचिव ताईसो डॉ स्मिता पाटील यांच्या हस्ते १,५०,०००/-रु चा धनादेश वितरीत करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब अॅड संदीप सुरेश पाटील यांनी कुटुंबीयाप्रती संवेदना व्यक्त करताना भविष्यात शैक्षणिक मदत करण्याचे आश्वासित केले. सुत्रसंचलन केंद्रसयोजक श्री पी.आर.पाटील यांनी केले याप्रसंगी प्रभारी प्राचार्य डॉ के.एन.सोनवणे विद्यार्थ्याचे पालक श्री सदाशिव महारु बारेला श्री ऊखा गुलाब बारेला श्री विशाल सदाशिव बारेला उपस्थित होते.*