कांचन नगर प्रभागात माजी नगरसेवक किशोर बाविस्कर यांच्या कामांची चलती..! येत्या निवडणुकीतही आयाराम गयारामांची बंद होईल बोलती..!!

 कांचन नगर प्रभागात माजी नगरसेवक किशोर बाविस्कर यांच्या कामांची चलती..! येत्या निवडणुकीतही आयाराम गयारामांची बंद होईल बोलती..!! 

जळगाव दि.१८(प्रतिनिधी)महानगराची प्रभाग क्रमांक दोन  कांचन नगर भागात माजी नगरसेवक किशोर बाविस्कर व माजी नगरसेविका उज्ज्वला ताई किशोर बाविस्कर यांना या दाम्पत्यांनी जीवाचे रान करत संपूर्ण वार्ड परिसरात रस्ते, गटार,पथ दिवे आदी समस्यांचा जोरदार निपटारा करत वार्डवासीयांच्या चेहऱ्यावर स्मित खुलवण्याचे काम केले आहे या कामाची पावती म्हणून सत्कार सोहळ्याप्रसंगी नागरिकांच्या पॉझिटिव्ह प्रतिक्रिया उमटल्या आहेत. येत्या  निवडणुकीत पुन्हा या दांपत्याच्या गळ्यात विजयाची  माळ घालू असा दावाही त्यांनी ठोकला आहे. ज्येष्ठ नागरिक ,महिला व गुणवंतांचा गुण गौरव सोहळ्याप्रसंगी नागरिकांनी ह्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 

नगरसेवक किशोर बाविस्कर आणि उज्वला बाविस्कर यांनी मनपा क्षेत्रात प्रशासक नियुक्ती पासून सदोदित पाठपुरावा करत आपल्या वार्डामध्ये जनहिताची सर्वोच्च कामे मनोभावे पोट तिळकीने  पार पाडले आहेत त्यामुळे संपूर्ण वार्डाचा कायापालट होऊन जनतेला चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत म्हणून भविष्यात हे दांपत्य या भागातून पुनश्च निवडून आणू असा दावा रहिवाशांनी केला आहे. विशेष म्हणजे प्रशासकीय राजवटीत जळगाव महानगराचा विकास जवळपास थांबला होता मात्र या कालावधीतही या दांपत्याने जनहिताच्या कामासाठी स्वतःस झोकून घेऊन कामांचा निपटारा जलद गतीने केला आहे.परिणामी त्यांचा कामाचा  पल्ला अवजड झाला आहे आज तरी सर्व  वार्ड वासियांनी बाविस्कर  दाम्पत्याच्या नावाला नंबर एकची पसंती दिली आहे. सत्काराला उत्तर देतांना किशोर बाविस्कर यांनी म्हटले आहे की, जनहितासाठी आम्ही पती-पत्नी पुढील आयुष्य असेच खर्ची घालणार असून वार्डातील जनतेसाठी रात्री अपरात्री  केव्हाही जनतेच्या पाठीशी उभे राहू , सत्ता असो वा नसो तरी आम्ही सदैव जनतेच्या समस्यांसाठी तीळ तीळ झटणार असल्याचे म्हटले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने