प्रताप विद्या मंदिरात विद्यार्थी प्रवेशोत्सव उत्साहात.. मोफत पाठ्यपुस्तक वितरण

 प्रताप विद्या मंदिरात विद्यार्थी प्रवेशोत्सव उत्साहात.. मोफत पाठ्यपुस्तक वितरण 


चोपडा दि.१८(प्रतिनिधी): दिनांक 16 जून 2025 वार सोमवार रोजी प्रशालेत शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात शाळेचा मुख्य दरवाजावर  मुख्याध्यापक  पी.एस. गुजराथी सर , उपमुख्याध्यापिका एम.  डब्ल्यू.पाटील मॅडम व सर्व पदाधिकारी ,शिक्षकांतर्फे विद्यार्थ्यांना  गुलाब पुष्प देऊन  व त्यांच्यावर फुला पाकळ्यांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. सोबत बँड पथक होते.  तद्नंतर शैक्षणिक वर्ष 2025–26 मध्ये नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे  प्रातिनिधिक स्वरूपात मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम झाला व सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचे व नवीन रुजू झालेल्या शिक्षकांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रवेशोत्सव कार्यक्रम प्रसंगी प्रास्ताविक सकाळ विभागाचे पर्यवेक्षक श्री .पंकज ए.नागपुरे  सर यांनी केले तर विद्यार्थ्यांशी हितगुज व मनोगत शाळेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती एम. डब्ल्यू पाटील यांनी केले.प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  श्री. एन. एन महाजन सर यांनी केले

फलक लेखन व पाटी लेखन कलाशिक्षक श्री. कमलेश गायकवाड  सर व श्री.पंकज नागपुरे सर यांनी केले. आकर्षक अशी रांगोळी शाळेच्या सर्व शिक्षक भगिनींनी काढली.आभार प्रदर्शन श्री. एस. एस. खान सर यांनी केले. श्री जावेद सर यांनी उत्तम फोटोग्राफी केली तसेच श्री मलिक सर यांनी प्रवेशोत्सवाचे सुंदर व्हिडिओ तयार केले. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने