घोडगाव येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी आले बैलगाडीवर बसून

 घोडगाव येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी आले बैलगाडीवर बसून 

    घोडगाव ता. चोपडा दि.१८(प्रतिनिधी)येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिल्या दिवशी बैलगाडीत बसून विद्यार्थी आल्याने या शाळा प्रवेशोत्सवाने गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. या सोहळ्यात तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्यासह गावातील प्रमुख पदाधिकारी यांनी सहभागी होऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला.

   १६ रोजी सकाळी आठ वाजता जि.प. प्राथमिक केंद्र शाळा घोडगाव येथे इयत्ता पहिली दाखल पात्र नवोगतांचे स्वागत व शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम  तहसीलदार भाऊसाहेब थोरात साहेब, सरपंच इंदुबाई भिल, उपसरपंच किशोर दुसाने, यांची प्रमुख उपस्थितीत नवोगतांची बैलगाडीवर गावातून मिरवणूक काढण्यात आली.

   

 यावेळी झालेल्या कार्यक्रमात वृक्षारोपण, शालेय गणवेश व मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. विद्यार्थी सेल्फी पॉईंट व शाळेतील पहिले पाऊल आकर्षणाचा मुद्दा ठरला. शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक विलास पाटील यांनी शाळेच्या गेल्या वर्षभरातील विकास व गावातील सहकार्याबद्दल माहिती सादर केली. यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी पहिलीच्या विद्यार्थ्यांशी हितगुज करत त्यांचा उत्साह वाढवला.  तसेच कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले व सर्व शिक्षक वृंदांचे कौतुक केले.

     यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, उपाध्यक्ष सुनिल कोळी, व्ही. पी. पाटील, मिनाजबी मन्यार, मुकेश शिरसाठ सर्व ग्रामपंचायत  सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी उपेंद्र पाटील, व पालकांची उपस्थिती होती.

         सूत्रसंचालन  संदीप सनेर यांनी तर आभार रणजितसिंग ठाकूर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका  प्रतिभा सोनवणे,  राजशेखर सोनवणे मयूर पाटील, मिनाक्षी पाटील, मोहिनी पाटील यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने