स्केटिंग चॅम्पियन कु.तेजस्विनी सोनवणे हिचा दिल्लीत स्वर्ण भारत पुरस्काराने गौरव

 

स्केटिंग चॅम्पियन कु.तेजस्विनी सोनवणे  हिचा दिल्लीत स्वर्ण भारत पुरस्काराने गौरव

जळगाव दि.१८(प्रतिनिधी)स्केटिंग खेळा मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल तेजस्विनी विनोद सोनवणे हिला दिल्ली येथे झालेल्या इंडिया प्राऊड बुक्स ऑफ रेकॉर्ड्स ( india proude books of records) मार्फत आयोजित कार्यक्रमात "स्वर्ण भारत पुरस्कार 2025 "देऊन गौरविण्यात आले. त्या बद्दल तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. हा पुरस्कार दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात प्रेमानंद जी महाराज व महामंडलेश्वर स्वामी डॉ.वैष्णवी जगदंबा नादगिरी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला आहे.

कु.तेजस्वीनी विनोद सोनवणे  हिचा जन्म कोळी समाजातील सर्व सामान्य कुटुंबात झाला असून तिने परिस्थितीची जाण ठेवत स्केटिंग मध्ये भाग घेत उत्तुंग कामगिरी बजावत आहे.ती जळगांव येथील स्केटिंग खेळाडू असून तिला लेवा एज्युकेशन चे अध्यक्ष व नंदिनी बाई वामनराव मुलींचे विदयालयाचे चेअरमन नंदकुमार बेंडाळे सर आणि तिचे स्केटिंग प्रशिक्षक रणजित पाटील सर आणि रीना पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन लाभत आहे.तेजस्वीनीने आता पर्यंत स्केटिंग खेळामध्ये  140 मेडल पटकविले आहे.जवळपास एका तासात 43 किलो मीटरचं अंतर पार केले .सलग चार वर्ष खेळून ती कधीही पराभूत  झाली नाही.तसेच Arsec आशिया ऑनलाईन इव्हेंट मध्ये 3.50 मीटरचं अंतर 27.3 सेकंदमध्ये पार केलं आहे.दिल्ली येथील सन्मान झाल्यानंतर जळगाव येथे तिची वाजत गाजत मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले आहे.जळगांव चे आमदार राजू मामा भोळे यांनीही सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने