तळ हातावर काबाडकष्ट करून पोट भरणाऱ्या कोळी कुटुंबातील कु.गायत्री सपकाळे हिचे नेट परीक्षेत दैदिप्यमान यश.. समाजहित जोपासणारे नगरसेवक धावले सत्कारासाठी
जळगाव दि.१८(प्रतिनिधी)नुकताच लागलेल्या नेट परीक्षेच्या निकालात अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या कांचन नगरातील कु, गायत्री भगिरथ सपकाळे,(कोळी) हिने जिल्ह्यातील प्रथम क्रमांक पटकावला आहे.तिचे वार्डातील समाजसेवी धडाकेबाज नगरसेवक किशोर आप्पा बाविस्कर यांनी शाब्बासकीची थाप देत पुढील वाटचालीबद्दल सदिच्छा दिल्या आहेत.
तळ हातावर काबाडकष्ट करून पोट भरणाऱ्या या कुटुंबातील परिवाराचा रहाटगाडा जेमतेम सुरू आहे.वडिल भगिरथ गजमल सपकाळे (कोळी) हे हात मजुरीचे काम करतात तर आई सौ.गिता सपकाळे ह्या खाजगी दुकानात मोल मजुरी करून उदरनिर्वाह करतात.घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती लक्षात घेऊन कु.गायत्री सपकाळे हिने अभ्यासाभर देत नेट परीक्षेत ७२०पैकी ६०६ गुण मिळवत जिल्ह्यातून पहिला येण्याचा मान मिळविला आहे.
तिच्या यशाबद्दल तिच्या घरी जाऊन कांचन नगर भागातील नगरसेवक किशोर रमेश बाविस्कर व माजी नगरसेविका उज्वलाताई किशोर बाविस्कर ह्यांनी तिला पेढा भरवून सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .यावेळी प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने येऊन तिचे कौतुक करीत जोरदार अभिनंदन केले आहे.