हस्ती बँक चोपडा शाखेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त ३० जून रोजी भव्य रक्तदान व मोफत नाक, कान, घसा तपासणी शिबीराचे आयोजन
चोपडा दि.१९(प्रतिनिधी)हस्ती बँक, चोपडा शाखेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सोमवार, दि.३० जून २०२५ रोजी श्री भगवान महावीर मार्ग, जुन्या चावडी ऑफिस जवळ, मेन रोड, चोपडा, जि. जळगांव येथे सकाळी १०:०० ते दु. ०५:०० वाजेच्या दरम्यान मोफत कान, नाक, घसा तपासणी व रक्त दान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबीरात कानाची व नाकाची , घसा व स्वरयंत्र यांची तपासणी दुर्बीणद्वारे करण्यात येणार आहे.
डॉ. विनोद जगन्नाथ पवार (M.B.B.S., DORL, ENT Surgeon)(श्वास हॉस्पिटल, चोपडा)व डॉ. दिव्या दिपक चौधरी (M.B.B.S., DORL, ENT Surgeon) ह्या तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा रूग्णांना लाभणार आहे.तसेच रक्त दान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी रक्त दात्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन रक्तदान करावे तसेच नाक, कान, घशाच्या रुग्णांनी मोफत तपासणीचा लाभ मोठ्या प्रमाणावर घ्यावा असे आवाहन चोपडा शाखा सल्लागार समितीचे कुशलकुमार अनिलजी जैन (चेअरमन),जीवन ओंकारजी चौधरी (व्हा. चेअरमन),प्रविण ताराचंदजी अग्रवाल,शाम ओंकारदासजी लाड,शैलेश पारसमलजी बरडिया,डॉ. दिपक रूपसिंगजी चौधरी,निलेश मोरेश्वरजी देसाई
प्रणव शिरीषजी गुजराथी (शाखा व्यवस्थापक),मदनलाल शांतीलालजी जैन (चेअरमन बोर्ड ऑफ मॅनेजमेंट),कैलास कांतीलालजी जैन (अध्यक्ष) डॉ. दिलीपकुमार केशरमलजी चोरडीया(उपाध्यक्ष),सतिष केसरीमलजी जैन (मुख्य कार्यकारी अधिकारी) आदींनी प्रसिद्ध पत्रकान्वये केले आहे.