चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती विकासाच्या वाटेवर : ३१ लाखांचे काँक्रिटच्या कामाचे भूमिपूजन
चोपडादि.२९(प्रतिनिधी) चोपड़ा कृषि उत्पन्न त्पन्न बाजार समितीत गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी, व्यापारी, हमाल यांच्यासाठी अनेक कामे करण्यात आली. अंतर्गत ३१ लाखांचे ट्रिमिक्स कामाचे भूमिपुजन करण्यात आले. यामुळे सर्व घटकांना या विकासकामांचा फायदा होईल.
२८ रोजी सकाळी ११ वाजता कृषी उत्पन्न बाजार चोपडा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार लता चद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख आतीथी जिल्हा बँक संचालक घनशाम आग्रवाल, जिल्हा दूध संघाचे सचालक रोहीत निकम होते. यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे शेतकरी बांधवांसाठी बाजार समितीचे सभापती व सचालक यांना सुचना दिल्या शेतकरी हिताकरता जे. सी. बी. घेण्यास सांगितले. तसेच काही नवीन प्रोजेक्टसाठी पणन मंत्र्यांशी बैठक घेऊन काही नवीन योजना आणण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी आमदार लता सोनवणे , जळगाव जिल्हा सहकारी बँकचे संचालक घनश्याम अग्रवाल , महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ लि.चे राज्य उपाध्यक्ष रोहित निकम , कृ.उ.बा. समिती सभापती नरेंद्र पाटील, उपसभापती विनायक चव्हाण , भाजपचे मंडल अध्यक्ष कांतिलाल पाटील , नरेंद्र पाटील , पिंटू पावरा, मंगला पाटील , संध्याताई महाजन , स्वाती बडगुजर , अनिता शिरसाठ, मनिषा पाटील , शितल देवराज , सविता पाटील, कल्पना पाटील , रावसाहेब पाटील, शिवराज पाटील, गोपाल पाटील, विजय पाटील, किरण देवराज, मनोज सनेर , मिलिंद पाटील , सुनिल जैन , सुनिल अग्रवाल, नंदकिशोर पाटील, नंदकिशोर सांगोरे , , नितीन पाटील रोहिदास सोनवणे , जितेंद्र देशमुख नामदेव पाटील, सचिन महाजन हे मान्यवर तसेच पदाधिकारी, व्यापारी आणि शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.
...................................
"शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य हितासाठी सुविधा निर्माण करणे, हीच आमची भूमिका असून अशा विकास कामांना सदैव प्राधान्य दिले जाईल," ----- आमदार चंद्रकांत सोनवणे
............................