चहार्डीला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरा संपन्न

चहार्डीला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरा संपन्न 

चोपडा दि.२९(प्रतिनिधी)चहार्डी येथे दिनांक 28 जून 2025 रोजी  महादेव मंदिरावर राज्य शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” अंतर्गत चोपडा तालुक्यातील सर्व गावांना एकत्रित महसूल व सर्वसमावेशक शासकीय सेवा शिबीराचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन  प्रा. आ. श्री चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून विविध योजनेचे लाभ व धनादेश प्रदान केले. शासनाच्या विविध विभागांनी एकत्रितपणे सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच प्रशासनाची सुविधा सुलभतेने मिळाली.

यावेळी श्री रोहित दादा निकम(  उपाध्यक्ष पणन महासंघ) ,श्री रावसाहेब  पाटील (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती),  प्रकाश रजाळे( घोडगाव ),चंद्रकला ताई दत्तात्रय पाटील( सरपंच चहार्डी) ,विनोद पाटील, बंडू चौधरी, किरण पाटील, जगदीश पाटील,दीपक बिऱ्हाडे, भुषण रायसिंग ,तहसीलदार  श्री. भाऊसाहेब थोरात, गटविकास अधिकारी श्री अनिल विसावे, श्री विरेंद्र राजपूत( सार्वजनिक बांधकाम विभाग), तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.प्रदिप लासुरकर ,महावितरणचे अभियंता , ग्रामीण पाणीपुरवठा,  सर्व तालुका स्तरीय अधिकारी, कर्मचारी व मंडळ स्तरावरील यंत्रणा उपस्थित होते कार्यक्रम संचालन व समारोप- सूत्रसंचालन श्री. भूषण पाटील (ग्राम महसूल अधिकारी) यांनी केले.याप्रसंगी विविध गावांतील लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने