अडावद येथे महाजन विद्यालयात छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन
अडावद ता. चोपडा,दि. २८(प्रतिनिधी):येथील शामराव येसो महाजन विद्यालयात छत्रपती शाहू महाराजांची जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर विद्यार्थी व शिक्षकांनी शाहू महाराज हे शिक्षण, कला, क्रीडा व आरक्षणाचे प्रणेते होते या विषयांवर प्रकाश टाकला.
२६ रोजी दुपारी चार वाजता श्री संत सावता माळी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचालित शामराव येसो महाजन विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर. के. पिंपरे हे होते. यावेळी इयत्ता सहावीचा विद्यार्थी यश किशोर पवार याने मराठीतून तर दहावीची विद्यार्थीनी हर्षदा गणेश महाजन हिने हिंदी भाषेत छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित भाषण दिले. पि. आर. माळी यांनी राजर्षी शाहु महाराज यांच्या संस्थानात उद्योगाभिमुख, सामाजिक न्याय, शिक्षण, कला, क्रीडा ,कृषी आदी क्षेत्रात केलेल्या जनकल्याणकारी कामांचा उल्लेख करीत शाहू महाराज यांच्या उल्लेखनीय कामगिरी विद्यार्थ्यांसमोर विषद केली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक आर. के. पिंपरे, उपशिक्षक व्हि. एम. महाजन, एस.जी.महाजन, एम.एन. माळी, पि. आर. माळी, एस बी. चव्हाण, एस. के. महाजन, पि.एस. पवार, लिपिक सी.एस. महाजन, ईश्वर मिस्तरी, रवींद्र महाजन, अशोक महाजन, कैलास महाजन यांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन पि. आर. माळी यांनी केले. तर आभार व्ही. एम. महाजन यांनी व्यक्त केले.