नीट , सिईटी परीक्षेत प्रताप विद्या मंदिराचे घवघवीत यश

 नीट , सिईटी परीक्षेत प्रताप विद्या मंदिराचे घवघवीत यश

चोपडा,दि.१९ (प्रतिनिधी) येथील प्रताप विद्या मंदिराच्या उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षा अर्थात नीट परीक्षेत तसेच अभियांत्रिकी पात्रता परीक्षा अर्थात सीईटी परीक्षेत उत्तम गुण संपादन करत विद्यालयाच्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे. 

नुकत्याच जाहीर झालेल्या सीईटी परीक्षेत पीसीएम गटात चैतन्य सुनील पाटील याने 99.53 पर्सेंटाइल पटकावत चोपडा तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर महाजन मिलिंद गोपीचंद याने 99.25 पर्सेंटाइल गुण मिळवत चोपडा तालुक्यात द्वितीय क्रमांक संपादन केला आहे. सोबतच पाटील निरंजन नरेंद्र (98.56), मराठे भुवनेश रमाकांत (90.88),सोनार हर्षल योगेश (87.14),ऐश्वर्या शैलेश शर्मा (85.90), धनश्री अनिल सोनवणे (85.52) यांनीही उत्तम गुण संपादन करत शाळेतला गौरव वाढवला आहे. 

      वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षा अर्थात नीट परीक्षेत देखील पाटील निरंजन नरेंद्र याने 506 गुण मिळवत आपला वैद्यकीय प्रवेश निश्चित केला आहे तर गाडीलोहार अनिरुद्ध संतोष (499), पाटील संकेत निलेश (474) या विद्यार्थ्यांनी देखील उत्तम गुणसंपादन करत आपल्या वैद्यकीय प्रवेशासोबत शाळेच्या नावलौकिकत देखील भर घातली आहे.

    सीईटी पी सी बी ग्रुपमध्ये  पाटील निरंजन नरेंद्र याने 99.92 पर्सेंटाइल मिळवत चोपडा तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. त्याच्यासोबतच गवळी चैताली अशोक (98.46), सोनार हर्षल योगेश (97.38), मराठे भुवनेश्वर रमाकांत (97.14),वेद राकेश बडगुजर( 97.05 ), कासार मंजिरी सचिन (96.56 ),सपकाळे किरण राजाराम (92.61),बडगुजर दिव्यानी प्रदीप (91.44),पालीवाल सिद्धी भूपेंद्र (89.48) या विद्यार्थ्याने देखील उत्तम पर्सेंटाइल मिळवून यशाचे नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत.

      या शैक्षणिक वर्षात बारा विद्यार्थ्यांनी नव्वद पेक्षा जास्त पर्सेंटाइल मिळवले. पीसीएम आणि पीसीबी ग्रुप मध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.

    सुटी कालावधीत विज्ञान विभागातील शिक्षक श्रीमती गजाला अन्सारी मॅडम,श्री डी एस पाटील सर, सौ मोनिका निकम मॅडम व प्रियंका पाटील मॅडम यांनी बारावीच्या विद्यार्थ्यासाठी घेतलेला क्रॅश कोर्स तसेच पात्रता परीक्षासाठी उपलब्ध असलेल समृध्द वाचनालय याची फलश्रुती विद्यार्थ्यांच्या यशात पहायला मिळते.    

     विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल चोपडा एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष मा.शैलाबेन मयूर, उपाध्यक्ष मा.विश्वनाथजी अग्रवाल, चेअरमन मा.राजाभाई मयूर, सचिव मा.माधुरीताई मयूर, कार्यकारणी सदस्य  मा.चंद्रहासभाई गुजराथी , मा.भूपेंद्रभाई गुजराथी, मा.रमेशकाका जैन तसेच शाळेचे मुख्याध्यापक पी एस गुजराथी , उपमुख्याध्यापिका एम डब्ल्यू पाटील, उपप्राचार्य जे एस शेलार, दुपार विभागाचे पर्यवेक्षक ए एन भट, गावातील विभागाचे पर्यवेक्षक एस व्ही करमकर,पंकज नागपुरे ,समन्वयक गोविंद गुजराथी, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी त्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने