पंकज विद्यालयातील स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा संपन्न

 पंकज विद्यालयातील स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा संपन्न

चोपडा दि.३०(प्रतिनिधी)पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 12 वी तील IIT , NEET , CET ( PCM / PCB ) परीक्षेतील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा संस्था संचालक मा.भैय्यासाहेब पंकज बोरोले यांच्या शुभहस्ते दिनांक 30 जुन 2025 रोजी उत्साहात पार पडला.पंकज उच्च माध्यमिक विद्यालयातील IIT, NEET, CET स्पर्धा परीक्षेतील 27 गुणवंतांचा पालकांसह गुणगौरव सोहळा संचालक मा. भैय्यासाहेब पंकज बोरोले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक व्ही.आर.पाटील सर यांच्या प्रास्ताविकाने झाली.त्यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करत शाळेच्या शैक्षणिक परंपरेचा गौरव वाढविल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सर्व गुणवंतांचा सत्कार संचालक भैय्यासाहेब पंकज बोरोले  यांच्या हस्ते करण्यात आला. काही गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मनोवतामध्ये विद्यालय व शिक्षकां विषयी गुणगौरव व्यक्त केले.आपल्या प्रेरणादायी अध्यक्षीय भाषणात मा. भैय्यासाहेब पंकज बोरोले  म्हणाले, "फक्त यश मिळवून थांबू नका. व्यावसायिक बना आणि स्वतःसोबत इतर कुटुंबांनाही रोजगार उपलब्ध करून द्या. शाळा नेहमी तुमच्या पाठीशी उभी राहील,असे आश्वासनही त्यांनी दिले. सत्कार झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ओम महेंद्र पाटील,आयुष्य यशवंत चौधरी,कृष्णा सुधीर बडगुजर ,आदित्य ज्ञानेश्वर पाटील,तन्वी नितीन पाटील,साई संदीप गुजर,प्रियानी रवींद्र महाजन,श्वेता विजय लोहार,चेतन गोरख पाटील,पूर्वेश शत्रुघ्न जाधव,भाविका समाधान पाटील,यशश्री सुरेंद्र महाजन,देवेंद्र राजेश्वर पाटील,भाविका रमेश पाटील,युक्ती जगदीश पाठक,प्रांजल रोहिदास पाटील,रोहन संजय देशमुख,भूमी शैलेंद्र पाटील,भक्तराज किशोर पाटील,हर्षदा जितेंद्र पाटील,निशांत शरद पाटील,नचिकेत अरविंद पाटील,निधी प्रल्हाद पाटील दुर्गेश रवींद्र पाटील,खुशवंत प्रेमराज शिंदे ,दर्शन भगवान पाटील, प्रसन्ना संतोष महाजन, धनश्री देविदास बोरसे,प्रांजल अनिल कोठावदे होते.या समारंभाने विद्यार्थ्यांना नवचैतन्य मिळवून दिले असून पुढील वाटचालीसाठी शिक्षक व पालकांकडून त्यांना भरभरून शुभेच्छा मिळाल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.जे.बाविस्कर सर यांनी केले.तर आभारप्रदर्शन एन.आर.न्हावी सर यांनी केले. 

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थाध्यक्ष डॉ.सुरेश बोरोले,उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक नारायण बोरोले, गोकुळ भोळे,अशोक कोल्हे, विभाग प्रमुख एम.व्ही.पाटील सर,मुख्याध्यापक व्ही.आर.पाटील सर आदींनी कौतुक केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डी.जे.बाविस्कर,एन.आर.वाघ,वैशाली पाटील, जितेंद्र महाजन,अजय सैंदाणे,योगराज रायसिंग, संजय भादले ,सौरभ कुलकर्णी, विजय पाटील , गजानन पाटील आणि वेलसिंग बारेला यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने