आंतरराष्ट्रीय रंगोत्सव स्पर्धेत कु.दिया पाटीलने पटकावला "द क्रीएटीव्ह आर्टिस्ट अवार्ड"चा बहुमान
♦️प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या ११ विद्यार्थ्यांचे यश
चोपडा दि.३० (प्रतिनिधी) रंगोत्सव सेलिब्रेशन, मुंबई आयोजित आंतरराष्ट्रीय कला स्पर्धेत प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बहुमान पटकावला आहे. या स्पर्धेत विविध इयत्तांतील विद्यार्थ्यांनी रंगभरण, हस्ताक्षर, ग्रीटिंग कार्ड व फिंगर अँड थम्ब अशा विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी केली.
विशेषतः कु.दिया भाग्यश्री श्रीकांत पाटील (इयत्ता 2री) हिने ‘The Creative Artist Award’ मिळवत HD फुल डिजिटल कॅमेरा व मेडल हा पुरस्कार जिंकला. तर कु.मैत्रयी संतोष कदम (इयत्ता 6वी) हिने रंगभरण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत ट्रॉफी व Spectacular Performance Award तिच्या सह इतर दहा विद्यार्थ्यांनी पटकावला.रंगोत्सव तर्फे प्रति वर्षाप्रमाणे यंदाही इंटरनॅशनल आर्ट कॉम्प्युटिशन आयोजित करण्यात आली होती. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या अकरा विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी वेगवेगळ्या प्रकारात पदके व बक्षिसे पटकावली.
सर्व सुयश प्राप्त यशस्वितांचे संस्थेचे अध्यक्ष चेअरमन राजाभाई मयूर, अध्यक्ष शैलाबेन राजेंद्र मयूर, उपाध्यक्ष विश्वनाथ सीताराम अग्रवाल, सचिव माधुरीताई मयूर, समन्वयक गोविंद गुजराथी, प्राचार्य रजीश बालन आदींनी अभिनंदन केले आहे.या स्पर्धेत कलाशिक्षिका म्हणून श्रीमती मनिषा पाटील व श्रीमती निखिला रजीश यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशामागे शाळेचे प्राचार्य रजीश बी., तसेच कला शिक्षक मनीषा पाटील व श्रीमती निखिला रजीश यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना योग्य दिशा देण्यासाठी शाळेतील शिक्षकांचे योगदान कौतुकास्पद आहे.बक्षीस प्राप्त सर्वांचे सर्व थरातून अभिनंदन केले जात आहे.