क्लासेस नियंत्रण कायद्या संदर्भात शिक्षणमंत्र्यांना संघटनेचे निवेदन.‌.विविधअटींनीयुक्त विधेयक मांडण्यात येत असल्याने सोपे नियमावली करण्याची मागणी

 क्लासेस नियंत्रण कायद्या संदर्भात शिक्षणमंत्र्यांना संघटनेचे निवेदन.‌.विविधअटींनीयुक्त  विधेयक मांडण्यात येत असल्याने सोपे नियमावली करण्याची मागणी 

नाशिक दि.३०(प्रतिनिधी) : विधानसभेच्या सध्याच्या अधिवेशनात, राज्यातील कोचिंग क्लासेस नियंत्रण व नियमन विधेयक, मांडण्यात येणार आहे. हे विधेयक विधानसभेत मंजूर झाल्यास, त्याचे कायद्यात रूपांतर होईल व इतर राज्यांप्रमाणे, खाजगी क्लासेस सुरू करायचे असल्यास किंवा सध्या अस्तित्वात असलेल्या कोचिंग सेंटर्सला, सरकारची रितसर परवानगी घ्यावी लागेल व विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या सुविधा पुरवाव्या लागतील.*

       या अशा अनेक अटींनीयुक्त हे विधेयक मांडण्यात येणार आहे परंतु या नविन कायद्याच्या अंमलबजावणीनंतर, सर्वसामान्य क्लासेस संचालकांला क्लासेस घेण्यास अडथळा निर्माण होऊ नये व साधी सोपी नोंदणी करुन, नियम तयार करावेत अशी मागणी संघटनेने काल शिक्षणमंत्री दादा भुसे यांना भेटून त्यांच्याकडे केली. यासंदर्भात एक निवेदनही देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे, उपाध्यक्षा विद्या राकडे,  प्रतिभा देवरे , रोहिणी भामरे, कांता घाडगे, मेघा हिरवे,  सोनाली आहेर, माजी राज्याध्यक्ष शिवाजीराव कांडेकर, अण्णासाहेब नरुटे,  मुकुंद रनाळकर, वाल्मिक सानप,  किशोर सपकाळे, खजिनदार रविंद्र पाटील,  कैलास देसले, सचिन अपसुंदे, सुनील सोळंकी,  किरण सुर्यवंशी, गणेश कोतकर, अर्जुन शिंदे, दीपक गुप्ता, विष्णू चव्हाण,  मयुर जाधव, दिनेश राठोड, गणेश पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते मंत्र्यांनी  आश्वासन दिले की,  विधेयक मांडण्यात येईल पण जास्तीत जास्त प्रयत्न करेल की, व्यवसायाला बाधा येणार नाही.*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने