लाडक्या बहिणीची रस्त्यावरचं भयावह प्रसुती, साड्या आडव्या लावून भगिनींनीच वाचवली ईभ्रत..अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिका न पोहोचल्याने आरोग्य विभागाबाबत महिलांचा संताप
चोपडा दि.२८(प्रतिनिधी):_अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचल्याच्या टीमक्या मिरवत आहोत आणि दुसरीकडे आपलीच एक लाडकी बहीन रस्त्यावर प्रसूत होत आहे. अजून किती दिवस माझ्या लाड़क्या बहिनीची प्रगतिशील भारताच्या खोट्या जाहिरातीच्या मागे अशी हेडसांड होत राहिल. ही घटना आहे जळगाव जिल्ह्यातील चोपड़ा तालुक्यातील बोरमळी येथील आहे._
_एका गर्भवती महिलेचं रस्त्यावर बाळंतपण करावं लागणं ही घटना महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी काळीमा फासणारी आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या बोरमळी इथली ही घटना शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. लाडक्या बहिणींना १५०० रूपये दिले म्हणजे राज्य सरकारची जबाबदारी संपली काय? आपली आरोग्य यंत्रणा नेमकी काय करतेय? कुठे गेल्या रूग्णवाहिका, कुठे गेली प्राथमिक आरोग्य केंद्र ? झोपलेल्या यंत्रणेनं आतातरी जागं होऊन अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष द्यावं*_
लाडकी बहिण योजनेच्या नावाखाली वल्गना होण्याचे प्रकार अनेक घटनांतून होतांना रोजच नवं नवीन चित्र पाहावयास मिळत आहे.आरोग्य विभाग असून नसल्यासारखे आहे.अति दुर्गम व आदिवासी भागात आदिवासींच्या मुलभूत सोयी सुविधांकडे जातीने दूर्लक्ष होण्याची बाब वारंवार उघड होत असते मात्र प्रशासनावर बसलेले लोकसेवक सोयिस्करपणे काना डोळा करीत असतात. हे कुठवर चालेल ? आणि याकडे कोण लक्ष घालेल ? हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत.फोन करूनही अॅम्ब्यूल्सन वेळेवर येत नाही मग अशा सुविधेचा फायदा काय? असा प्रश्न आज येथे जमलेल्या भगिनींनी काढला आहे.