हातेड पेट्रोल पंपाजवळ दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील चौघांना अटक..३लाख २३हजारांचा मुद्देमाल जप्त.. चोपडा ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेने टळला अनर्थ

 हातेड पेट्रोल पंपाजवळ दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील चौघांना अटक..३लाख २३हजारांचा मुद्देमाल जप्त.. चोपडा ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेने टळला अनर्थ 

चोपडा,दि.२८(प्रतिनिधी) तालुक्यातील जवळील हॉतेड-गलंगी रस्त्यावरील युग पेट्रोल पंपाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास चार जण दरोडा टाकण्याच्या इरादात असताना ग्रामीण पोलिसांनी चोख कामगिरी बजावत चौघांना अटक केली असून३लाख २३हजाराचा  मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्राकडून प्राप्त माहिती अशी की, दिनांक 28/0 5 /2025 रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास हातेड बुद्रुक गावाच्या हद्दीत युग पेट्रोल पंप जवळ चार जण  संशयित हालचाल करीत असल्यची गुप्त माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी   सापळा रचत सोनू चक्कर चव्हाण (वय 25), यशवंत निराधार पवार (वय 42) ,धर्मा चीमन भोसले( वय40) ,भरत निराधार पवार (वय 38 )सर्व राहणार जामदे, ता. साखरे जि. धुळे यांना ताब्यात घेतले असता यांच्याकडून दरोडा टाकण्याचे साहित्य मिरची पूड ,79 धातूच्या पट्ट्या काळा रंगाची बॅग मोटार सायकली व मोबाईल असा तीन लाख 23 हजाराचा मुद्देमाल मिळून आला आहे.  या  चौघांचा मोठा दरोडा टाकण्याचा इरादा होता  पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला  आहे .

या घटनेतील आरोपींकडून 245 ग्रॅम 250 ग्रॅम लाल मिरची पावडर ,79 पिवळ्या धातूच्या पट्ट्या, काड्या रंगाची बॅग रियल मी कंपनीचा 14 प्रो पांढऱ्या रंगाचा मोबाईल, विवो कंपनीचा 290 आकाशी रंगाचा मोबाईल, ओपो कंपनीचा ए थ्री एक्स चॉकलेटी रंगाचा मोबाईल, मोटोरोला ईडीजी 50 हिरव्या रंगाचा मोबाईल, केटीएम कंपनीची लाल रंगाची मोटर सायकल (क्रमांक एम एच 18 सीडी 88 71), होंडा कंपनीची युनिकॉन मोटरसायकल (क्रमांक एम एच 18 bu 64 )असा मुद्देमाल मिळून आलेला आहे 

याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात सी सी टी एन  एस  गु. रं.नं. 169/ 2025बीएन एस कलम 310 (4)प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनास्थळी  पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी भेट दिली असून पुढील तपास सपोनि नितीन नितनवरे ह हे करीत आहेत..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने