वेळोदे गावी संत भीमा भोई जयंती उत्साहात साजरी
चोपडा,दि.२७ (प्रतिनिधी)तालुक्यातील वेळोदे येथे भोई समाजाचे आराध्य दैवत, संत श्री भीमा भोई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी पं. स. माजी उपसभापती एम. व्ही. पाटील, सामाजिक कार्यकर्ते सागरभाऊ ओतारी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक किरण देवराज, तुषार पाटील आदी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून श्री संत भीमा भोई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार सौ. लताताई सोनवणे यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी बापू मोरे, शिवसेना प्रसिद्धी प्रमुख अशोक पवार, रतिलाल पारधी, बापू बोरसे, वासुदेव भोई, एकनाथ भोई, पूनमचंद भोई यांच्यासह भोई समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.