११ किलो गांजासह एक जण पोलिस जाळ्यात.. सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल जप्त .. चोपड़ा शहर पोलीसांची धडक कारवाई
चोपडा दि.27(प्रतिनिधी): चोपडा शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर सापळा रचून एकास साडेदहा किलो गांजा सह शिताफिने अटक केली आहे त्याच्या जोडी दोन लाख तीस हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांकडून प्राप्त माहिती अशी की,
दिनांक २७/०५/२०२५ रोजी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे धडाकेबाज पोलीस निरीक्षक श्री मधुकर साळवे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर पथक तयार करून चोपड़ा चुंचाळे रोडवरील एमएसडब्लु कॉलेज येथे सकाळी १०-०० वाजेच्या सुमारास सापळा रचला व चुंचाळेकडून चोपड्याकडे मो. सायकल क्रमांक एम पो ४६ एम डब्लू ६५८५ वरून येणारा इसम नामे कालुसिंग गोराशा बारेला, वय २६ वर्षे, रा. महादेव, ता शिरपुर, जि धुळे यास ताब्यात घेतले असता त्याच्या मो. सायकलवर बांधलेल्या गोणीमध्ये १० किलो ६०० ग्रॅम एवढा गांजा मिळून आला. पोलीस पथकाने जागेवर फॉरेन्सिक मोबाईल व्हॅन पाचारण करून त्यावरील तज्ज्ञांच्या सहाय्याने सदर गांजा त्याचप्रमाणे मोटारसायकल व संशयीताकडे मिळून आलेली रोख रक्कम असा एकुण २,३०,२०० रू किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर इसमाविरुध्द चोपडा शहर पोलीस स्टेशन गुन्हा नोंद क्रमांक ३३७/२०२५ एन डी पी एस कायदा कलम ८ (सी) सह २० (बी) (ii) (B), २२ (B) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, चाळीसगाव अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णासाहेब घोलप यांच्या सूचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, पोहेकॉ संतोष पारधी, पोहेकॉ लक्ष्मण शिंगाणे, पोहेकॉ रितेश चौधरी, पोहेकॉ ज्ञानेश्वर जवागे, पो.ना. संदिप भोई, पोकॉ विनोद पाटील. पोकॉ निलेश वाघ, पोकॉ महेंद्र पाटील यांनी पार पाडली.