राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेसाठी यशवंत पब्लिक स्कूल च्या सोहम माळी ची निवड
वाघळी(ता चाळीसगाव)ता २५: चौथ्या फास्ट फाईव्ह राष्ट्रीय सब ज्युनियर नेटबॉल स्पर्धेसाठी येथील यशवंत पब्लिक स्कूल चा नववी च्या वर्गातील विद्यार्थी सोहम विलास माळी या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
जळगाव जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशन चे सचिव प्रमोद पाटील व जिल्हा नेटबॉल प्रशिक्षक योगेश पांडे यांनी त्याची निवड केली.
येत्या 28 ते 30 मे 2025 दरम्यान अल्फाईन अकॅडमी (इंदौर, मध्य प्रदेश) येथे ही स्पर्धा होत आहे. सोहम माळी चे यशवंत पब्लिक स्कूल चे संचालक परमानंद सूर्यवंशी व मुख्याध्यापिका जयश्री सूर्यवंशी यांनी अभिनंदन व कौतुक केले.